26.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeRajapurएकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्द करा…

एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्द करा…

लढाई कोणत्या व्यक्तीवरोधी नसून, येथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आहे.

दादर येथे झालेल्या सभेला अॅड. असीम सरोदे यांनी संवाद साधला. या वेळी प्रथमेश गावणकर, अॅड. रोशन पाटील, अतुल म्हात्रे, सहदेव वीर, संतोष बारगुडे उपस्थित होते. वाटद एमआयडीसी संघर्ष कृती समितीचे प्रमुख प्रथमेश गावणकर यांनी विविध पुराव्यांच्या आधारे संवाद साधताना वाटद एमआयडीसीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा समाचार घेतला. ही लढाई कोणत्या व्यक्तीवरोधी नसून, येथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आहे. २०१९ला वाटद एमआयडीसी प्रस्तावित झाल्याचे सांगत २०२२ला वाटद एमआयडीसीसाठी प्रस्तावित जागा परवडणारी नसल्याचे कारण सांगून ती रद्द करण्यात येत असल्याची अधिसूचना जाहीर केली होती. १४ सप्टेंबर २०२४ ला नवीन प्रस्तावित अधिसूचना जाहीर करून ३२/२ची नोटीस जाहीर केली. ९ दिवसात जमीन मोजणी प्रक्रिया सुरू झाली; मात्र एमआयडीसीला कोणत्या उद्योगासाठी जागा संपादित करायची आहे, याचा अधिसूचनेत उल्लेख नाही. २५ सप्टेंबर २०२४ ला नोटीस काढून हरकती नोंदवण्याची नोटीस जाहीर केली. त्या जागेत कोणताही फेरबदल करायचा झाल्यास त्याला सरकारची अनुमती लागते; मात्र जमीनविक्री आजतागायत सुरू आहे.

३ ऑक्टोबर २०२४ ला ५०० पेक्षा अधिक सह्यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जनसुनावणी ही स्थानिक पातळीवर घेतली पाहिजे, ही आमची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२४ ला स्मरणपत्र देऊन मोजणी प्रक्रिया उधळून लावली. ९ दिवसांत कारवाई करणारे सरकार आमच्या मागणीला उत्तरे द्यायला ८ महिने लावते, अशी शोकांतिकाही गावणकर यांनी व्यक्त केली. वाटद येथील समर्थनार्थ १० हजार लोकं एकत्रित आली तरीही ती एक दिवस येतील. आम्ही एक हजार असू; परंतु शेवटपर्यंत लढू, असा इशारा त्यांनी दिला. वाटद एमआयडीसी रद्दची अधिसूचना जाहीर होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

चाकरमान्यांनी समाजबांधवांना सहकार्य करा – वाटद एमआयडीसी विरोधकांची बाजू समजून घेतली पाहिजे. ८५० सातबारे काढले त्यात खरेदी करणारे नेते, प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचेच लागेबांधे अधिक आहेत. जमीन खरेदी करणारे हे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय असल्याचे गवाणकर यांनी सांगितले. मुंबईस्थित ग्रामस्थांनी गणपती, शिमगोत्सव, दिवाळी अशा महत्त्वाच्या सणांना गावी येतात तेव्हा गावातील समाजबांधवांना सहकार्य करा, असेही त्यांनी कोकणातील मुंबईस्थित बांधवांना आवाहन केले.

RELATED ARTICLES

Most Popular