26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriमुली, महिलांसाठी कर्करोग सावधगिरी लस तालुकास्तरावर शिबिरांच्या सूचना

मुली, महिलांसाठी कर्करोग सावधगिरी लस तालुकास्तरावर शिबिरांच्या सूचना

९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी लसीचे २ डोस तसेच १५ वयोगटापुढे ३ डोस देण्यात येतात.

कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करावीत. त्यासाठी आठ दिवसांत रूपरेषा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. समिधा गोरे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करताना प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची मदत घ्या जेणेकरून ९ ते १४ वयोगटातील विद्यार्थिनींची तपासणी होईल. त्याचबरोबर महिलांची संख्या किती आहे, तेही या शिबिराच्या माध्यमातून समजेल. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी लसीचे २ डोस तसेच १५ वयोगटापुढे ३ डोस देण्यात येतात. नगरपालिकेने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी डायलिसिस युनिट सुरू करण्याबाबत सुस्थितीतील गाळे उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारी पाण्याची सुविधा द्यावी. जिल्हा शल्यचिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी चांगली रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular