रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळ काल दिनांक ११ रोजी दाभोळ महामार्गावर एक चार चाकी वाहन ४० हजार रुपये किमतीचा गांजा घेऊन विक्रीसाठी जात होती. सदरचा गांजा हा दोन किलो वजनाचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व दापोली पोलिसांनी शहरातील दाभोळ मार्गावर हा गांजा पकडला याप्रकरणी दोन संशयितांना देखील अटक करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी गुन्हा अन्वेषण विभागाला दापोली शहरात काही संशयित गांजा विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार बुधवारी सायंकाळी सापळा लावण्यात आला होता दापोली येथील केळकर नाका-दाभोळे फाटा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. यात दोन किलो गांजा जप्त करून संशयित मकसूद पावसकर व शाहिद पठाण या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या सर्व कारवाईत दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरीचे हेड कॉन्स्टेबल भागणे , झोरे, साळवी, बोरघरे सहभागी झाले होते.