24.6 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraवाद इतक्या विकोपाला गेला कि, एकाने गाडीसोबत दुसऱ्याला फरफटत नेले

वाद इतक्या विकोपाला गेला कि, एकाने गाडीसोबत दुसऱ्याला फरफटत नेले

भर चौकात दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की कार चालकाने गाडीसमोर उभं राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला काही अंतरापर्यंत गाडीसोबत फरफटत नेले.

मुंबईमध्ये वाहने आणि माणसांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे चुकून जरी एखाद्या वाहनाचा दुसर्या वाहनाला धक्का लागला तरी होणाऱ्या वादांमध्ये बाकीच्या वाहनधारकांचा मात्र अर्धा एक तास असाच निघून जातो.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात सिग्नल लागला होता. वाहन चालक सिग्नल ग्रीन होण्याच्या प्रतिक्षेत होते. इतक्यात दुचाकीस्वार व्यक्ती एका कार समोर उभा राहिला आणि त्याने कारवर मारण्यास सुरूवात केली. हे दृश्य बाजूला उभ्या असणाऱ्या एका नागरिकाने पाहिले आणि काहीतरी अनुचित प्रकार घडू शकतो, या संशयातून त्याने या प्रकारचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.

काही वेळाने सिग्नल सुटला असता कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भर चौकात दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की कार चालकाने गाडीसमोर उभं राहून भांडणाऱ्या दुसऱ्या तरुणाला काही अंतरापर्यंत गाडीसोबत फरफटत नेले.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी चौकात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा थरार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याच वेळी वाहतूक पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे कार शोधून काढत गुन्हा दाखल केला. प्रवीण चौधरी असं या कार चालकाचं नाव आहे. दुचाकी वाला तरुण कारच्या समोर उभा राहून वाद घालू लागल्याने राग अनावर न झाल्याने कारचालकाने भीती दाखवण्याकरता गाडी अंगावर घातल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular