आंजर्ले येथील समुद्र किना-यावर नेहमीच पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. तसे स्थानिक सुध्दा कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका फेरफ मारण्यासाठी आपल्या कुटूंबासह येत असतात अशाच प्रकारे आंजर्लेत राहणा-या पण पाडले आणि आंजर्ले परिसरात कंपनीत कामाला असणा-या काही हौशी कलाकारांनी आपल्या मौजमस्तीची भूक भागवण्यासाठी हे ठिकाण धोक्याचे आहे हे माहीत असुन देखील आपल्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची ईको कार समुद्रा किनाऱ्यावर घातली नंतर पाण्यात नेली अखेर समुद्राने त्यांना चांगलाच इंगा दाखवला. त्यांची कार अखेर पाण्यात बुडाली. पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाताना आपली चार चाकी वाहने ही आपल्या सुरक्षिततेसाठी समुद्र किनाऱ्यावर घेऊन जावू नये असे पर्यटक व्यवसायिकांकडून नेहमीच आणि सातत्याने सांगितले जाते. तरी सुद्धा काही पर्यटक हे त्याकडे दुर्लक्ष करतात. हे आपण फार तर समजू शकतो मात्र जे लोक पाडले येथे राहत आहेत.
त्यातील काही कामगार वा कंपनीचे अधिकारी हे आंजर्ले येथे राहत आहेत त्यांना येथील परिस्थिती चांगलीच ज्ञात आहे अशा लोकांनीच बुधवारी सायंकाळी आततीयपणा केला. हा आततीयपणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला, आणि समुद्र किनारा सफर त्यांना महागात पडली. त्याच असं झाल की, काही कामगार बुधवारी संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर आपल्या ताब्यातील चार चाकी वाहन घेऊन आले. पौर्णिमा असल्याने पाण्याला भरती होती. नेहमीपेक्षा अधिक समुद्राच्या पाण्याने किनारपट्टी व्यापली असताना देखील त्यांनी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन हे समुद्र किनाऱ्यावर मौजम स्ती करण्यासाठी घातले आणि त्यांच्या ताब्यातील कार समुद्र किनाऱ्यावरील पुळणीच्या पाण्यात रुतली. त्यात पौर्णिमेच्या भरतीचे पाणी वाढत गेले आणि त्यांची भंबेरी उडाली. कार पाण्यात बुडाली. स्थानिकांनी सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा कसा मनस्ताप सहन करावा लागतो हे आज त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले.

