25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriरत्नागिरी सिव्हीलमधील डॉ. अमरीश आगाशे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

रत्नागिरी सिव्हीलमधील डॉ. अमरीश आगाशे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल

मद्यप्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वागल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये जो काही प्रकार सुरु होता त्याचा बोभाटा होताच साऱ्या रत्नागिरीकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या संतापाची दखल संबंधितांनी तात्काळ घेतली आणि मद्यप्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी जो बेशिस्तपणा सुरु होता त्याबद्दल डॉक्टरविरुध्द रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अमरीश आगाशे असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टराचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी पत्रकारांना दिली. त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९८५ अधिनियम (१) आणि (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तोरस्कर यांनी दिली.

मद्यप्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणे वागल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले काही दिवस रत्नागिरीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये जो प्रकार सुरु होता तो चव्हाट्यावर येताच लोकांमध्ये संतापाची भावना उसळली होती. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु होत्या. मद्यप्राशन करुनं रुग्णांच्या जीवाशी खेळले तर जात नाही ना? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.

लोकांमध्ये उसळलेला संताप आणि झालेला बोभाटा याची दखल पोलिसांनी घेतली आणि या रुग्णालयातील एक डॉक्टर अमरीश आगाशे यांच्याविरुध्द मद्यप्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९८५ अधिनियम (१) (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा दाखल होताच आरोग्य यंत्रणादेखील हडबडली असून कोल्हापूरचे आरोग्य संचालक डॉ. दिलीप माने यांनी याबाबतचा अहवाल रत्नागिरीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मागविला आहे. हा अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही होईल असे डॉ. माने यांनी दूरध्वनीवरुन पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular