26.5 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiriसंगमेश्वरजवळ गुरे वाहतूक करणारी गाडी पकडली, संशयित ताब्यात

संगमेश्वरजवळ गुरे वाहतूक करणारी गाडी पकडली, संशयित ताब्यात

आखुड दोरीने मानेला बांधुन व कोंबुन त्यांची वाहतूक सुरू होती.

संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावर लोवले गावाजवळ गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पोलीसांनी पकडली असून त्यामध्ये ५ गुरे आढळल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी ५ गुरांसह बोलेरो गाडी आणि संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, बोलोरो पिकअप गाडीसह ५ गुरे संगमेश्वर पोलिसांनी पकडली असून ४ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीसांनी ही गाडी अडवून झडती घेतली असता त्यामध्ये गुरे सापडली. एकूण ४ बैल आणि १ पाडा यांना वेदना किंवा यातना होतील अशा प्रकारे आखुड दोरीने मानेला बांधुन व कोंबुन त्यांची वाहतूक सुरू होती. हे कुणाच्या निदर्शनास येऊ नये यासाठी हौद्याच्या चारही बाजूला ताडपत्री लावण्यात आली होती. गुरांची तपासणी न करता, गुरांना चारा पाणी यांची सोय न करता, गुरे खरेदी विक्रीची पावती नसताना तसेच गुरांची विनापरवाना वाहतूक सुरू असल्याने संशयित आरोपीं विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५,५ (अ), ५ (ब), ९, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (ड) (च), महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ११९, सह मो. वा. का. क. ६६/१९२, ३/१८१ सह, प्राण्यांची वाहतुक नियम १९७८ चे कलम ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५४,५६ भा. न्याय. सं. २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपाधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सचिन कामेरकर उपनिरीक्षक प्रशांत शिंदे मनवळ किशोर जोयशी, कोलगे यांनी हे कारवाई केली असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत. संगमेश्वर पोलिसांनी लागोपाठ केलेल्या कारवाईमुळे त्यांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular