22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRajapurराजापुरात परवानगी नसतानाही उरूस साजरा, गुन्हा दाखल

राजापुरात परवानगी नसतानाही उरूस साजरा, गुन्हा दाखल

राजापूर पोलीसांनी ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शहरात मच्छीमार्केटलगत असलेल्या वास्तुत उरूस साजरा करण्यासाठी म ागण्यात आलेली परवानगी जमावबंदी आदेश असल्याने राजापूर पोलीसांनी नाकारलेली असतानाही जमावबंदी आदेश झुगारून या ठिकाणी बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी उरूस साजरा केल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. या प्रकरणी परवनागीसाठी ज्यांनी अर्ज केला होता ते अल्ताफ कासम बारगीर (रा. बाजारेपठ राजापूर), त्यांचे सहकारी, मन्सुर काझी, सुलतान ठाकुर (रा. राजापूर) यांच्यासह सुमारे ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे केडगे यांनी सांगितले. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकातील पोलीस शिपाई अनिल लक्ष्मण केसकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजापुरातील मच्छीमार्केट लगत असलेली ऐतिहासिक वास्तु हे पुरातन सुर्य मंदिर असल्याचे नमुद करत या ठिकाणी मुस्लीम समाजातील काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत १९ फेब्रुवारी रोजी या ठिकाणी उरूस कार्यक्रम करणार आहेत त्याला प्रतिबंध करावा अशी मागणी हिंदू सम ाजाच्यावतीने एका लेखी निवेदनाद्वारे बुधवारी राजापूर पोलीसांकडे करण्यात आली होती. दरम्यान अल्ताफ कासम बारगीर यांनी देखील या ठिकाणी उरूस साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र प्रशासनाकडून ती नाकारण्यात आली होती. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू असल्याने परवानगी देता येणार नाही असे पोलीसांनी बारगीर यांना कळविले होते.

मात्र पोलीसांनी परवानगी नाकारलेली असतानाही व जमावबंदी आदेश असतानाही संबधितांकडून या ठिकाणी उरूस साजरा करण्यात आला व जेवणही ठेवण्यात आले होते. अप्पर जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांचेकडील मनाई आदेश प्राप्त झालेला असल्याने कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आलेली होती व तसे त्यांना राजापूर पोलीस ठाण्याच्यावतीने लेखी समजपत्र देण्यात आले होते. मात्र तरीही अल्ताफ कासम बारगीर व त्यांचे सहकारी मन्सुर काझी, सुलतान ठाकुर व अन्य ५० ते ६० जणांनी या आदेशाचा भंग करून उरूस साजरा करण्याचा प्रयत्न केला असे केसरकर यांच्या फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या फिर्यादीवरून राजापूर पोलीसांनी बारगिर व त्यांच्या सहकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये दिलेल्या मनाई आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन माझी त्यांचेविरुध्द भा.न्या.सं. कलम २२३.३ (५) व म.पो.का. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे केडगे यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास करत असल्याचेही केडगे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular