27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriवीज बिल भरणा केंद्र सुटी दिवशीही सुरू...

वीज बिल भरणा केंद्र सुटी दिवशीही सुरू…

सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करणे सोयीचे होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र रविवारी (ता. ३०) व सोमवारी (ता. ३१) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग देण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकी तसेच पुनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटीचा भरणा केल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यीक व औद्योगिक वर्गवारीतील ३६ हजार ४५९ वीजग्राहकांकडे ५ कोटी १४ लाख रुपयांची थकबाकी आहे.

यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ११ हजार ६३६ वीजग्राहकांकडे १ कोटी ८२ लाख आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ हजार ८२३ वीजग्राहकांकडे ३ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे. वीजग्राहकांना www mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीज बिलाचा भरणा करता

RELATED ARTICLES

Most Popular