27.8 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeRatnagiri२१ मार्च पासून जि.प. रत्नागिरीवर प्रशासक राज

२१ मार्च पासून जि.प. रत्नागिरीवर प्रशासक राज

दि. २१ मार्च रोजी जि.प. रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

अनेक दिवस गाजत असलेला विषय आणि जि.प. रत्नागिरी कार्यकाल संपून बॉडी बदलणार परंतु, निवडणुका लांबणीवर गेल्याने सध्या तरी आज २१ मार्च पासून जि.प. वर प्रशासक राज असणार याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांचा कार्यकाल दि. २० मार्च रोजी संपणार आहे. दि. २१ मार्च रोजी जि.प. रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत मणचेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, कृषी पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे यांच्यासह अन्य सदस्यांचा कार्यकाल दि. २० मार्च रोजी संपत आहे. पदाधिकार्‍यांना दि. २० मार्चपर्यंत निवासस्थाने व वाहने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार पदाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांनी कार्यवाही सुरू केली असल्याचे चित्र जिल्हा परिषदेमध्ये पहावयास मिळत आहे. वाहने जि.प. रत्नागिरी परिसरामध्ये जमा करण्यात आली आहेत.

कामकाजाच्या दृष्टीने गुरूवारी शेवटचा एकच दिवस शिल्लक राहिला असल्याने त्यानंतर आलेल्या शिमगा आणि धुळवडीची सुट्टी त्यामुळे सर्वच पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी मतदारसंघातील कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचे चित्र जि.प. मध्ये पहावयास मिळाले आहे. तसेच ज्या-ज्या विभागांत मतदार संघातील प्रलंबित कामे आहेत त्या विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना बोलावून ही कामे वेगाने मार्गी लावताना पदाधिकारी दिसत होते. त्यामुळे आज दि. २१ मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular