26.6 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiri११वी प्रवेश सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट ला

११वी प्रवेश सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट ला

कनिष्ठ महाविद्यालयातील २०२१-२२ शैक्षणिक वर्षाकरिता, सीईटीची परीक्षा ही ११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे. परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमावरच आधारीत असणार आहे. १६ जुलै रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.

संपूर्ण राज्यामध्ये शासन निर्णयानुसार ११ वी प्रवेशासंदर्भात सीईटीची परीक्षा एकत्रीत आयोजित करण्याचा निर्णय घेऊन त्याचा तपशील निश्‍चित करण्यात आला आहे. शासनाने सदर परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात आले आहे.

सीईटीची परीक्षा ही राज्य मंडळाअंतर्गत असलेल्या प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे  असणार आहे. सदर परीक्षेसाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या https://cet.mh-scc.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची सुविधा मंडळामार्फत आज २०/०७/२०२१ पासून सकाळी ११.३० पासून २६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अर्ज भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी अधिक सूचना मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. याबाबत विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाकडून कळविण्यात आले असून, नोंदणी अशी करायाची, त्याचा पाथ कसा आहे याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन, विद्यार्थ्यांचा दहावीचा आसन क्रमांक टाकून सीईटी परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे, तिथे दहावीच्या निकालाचे गुण अपडेट केलेले असतील, त्यापुढे तुमच्या नावासमोर सदर परीक्षेसाठी इच्छुक आहात किंवा नाही असे दोन पर्याय समोर उपलब्ध असतील, त्यातील योग्य पर्याय निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular