31.3 C
Ratnagiri
Wednesday, April 16, 2025

गोपाळगडावरील अनधिकृत बांधकाम तत्काळ हटवा!

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील राज्य संरक्षित गोपाळगडाच्या...

मायक्रो फायनान्स कंपन्यांना रोखा, अन्यथा कोकणातही येऊ शकते आत्महत्याची लाट !

मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात...

भविष्यात रत्नागिरी बालेकिल्ला असेल : ना. भाजपाचा नितेश राणे

भविष्यात रत्नागिरी हा भाजपाचा बालेकिल्ला असेल तसेच...
HomeIndiaचांद्रयान पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले!

चांद्रयान पृथ्वीच्या शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले!

चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल.

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-३ चे १४ जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. सध्या हे चांद्रयान पृथ्वीभोवती कक्षेमध्ये फिरत आहे. पृथ्वीभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने ढकलण्यात येईल. मंगळवारी या चांद्रयानाला चौथ्या कक्षेतून पाचव्या कक्षेत यशस्वीपणे ढकलण्यात आलं. पाचव्या कक्षेत ढकलण्यात आल्यानंतर काही वेळातच हे चांद्रयान पृथ्वीपासून १,२७,६०९ किलोमीटर बाय २३६ किलोमीटरच्या कक्षेत पोहोचेल. सध्या या यानाची स्थिती उत्तम असून, त्याची रेडियस काही चाचण्यांनंतर निश्चित सांगण्यात येईल. इस्रोने ट्रिट करत याबाबत माहिती दिली आहे.

पुढची फायरिंग १ ऑगस्टला – यानंतर १ ऑगस्ट रोजी हे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू करेल. यावेळी इस्रोकडून चांद्रयान- ३ ला शेवटचा पुश देण्यात येईल. या टप्प्याला ग्रन्सलुनार इंजेक्शन असं म्हटलं जातं. १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेदरम्यान ही क्रिया पार पडेल.

चंद्राभोवतीही मारणार फेर्‍या – चंद्राजवळ पोहोचल्यानंतर चांद्रयान- ३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. यासाठी ते चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीच्या कक्षेत स्थिरावण्यात येईल. यासाठी पृथ्वीच्या कक्षेतून ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बाहेर. पाठवण्यात आलं, त्याच्या अगदी उलट पद्धतीने चंद्राच्या कक्षेत ते प्रवास करेल. सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास, २४ ऑगस्ट रोजी चांद्रयान- ३ चंद्रावर लँडिंग करु शकेल असं इस्रोने स्पष्ट केलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular