26.9 C
Ratnagiri
Sunday, January 5, 2025

राज्यातील आता चोरटी वाळूला बसणार चाप…

राज्यातील वाळूमाफियांना वेसण घालण्यासाठी फडणवीस सरकारने मोठं...
HomeRajapurइलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या चार्जिंग पॉईंटची राजापूर शहरात वानवा

इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या चार्जिंग पॉईंटची राजापूर शहरात वानवा

इलेक्ट्रिक बाईकमुळे खर्चात बचत होते.

पेट्रोल, सीएनजी आणि डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत असल्यामुळे पर्याय म्हणून गेल्या काही वर्षात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडील कल वाढलेला आहे. या वाहनांमुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. राजापुरात इलेक्ट्रॉनिक दुचाकी आणि चारचाकी मिळून ३५ हून अधिक गाड्या असून, भविष्यात त्या वाढण्याची शक्यता आहे; मात्र, त्या तुलनेमध्ये सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पॉइंट कुठे आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बाईकला वाहनचालकांकडून मागणी वाढू लागल्याचे चित्र आहे. राजापूरमध्येही वाहनचालकांचीही इलेक्ट्रिक बाईकला पसंती मिळताना दिसत आहे. त्यामध्ये आधी इलेक्ट्रिक कार आल्या नंतर इलेक्ट्रिक बाईक लाँच झाल्या आणि इलेक्ट्रिक सायकलसुद्धा मार्केटमध्ये येत असल्याचे सांगितले जात आहे. सद्यःस्थितीमध्ये राजापूरमध्ये चाळीसहून अधिक बाईक आहेत. या बाईकमधील चार्जिंग संपल्यास त्या चार्जिंग करण्यासाठी मात्र सार्वजनिक ठिकाण म्हणून शहरामध्ये नगर पालिकेचा एकमेव चार्जिंग पॉइंट आहेत.

ग्रामीण भागाचा विचार करता शहरानजीकच्या कोदवली येथे मुंबई- गोवा महामार्गावरील हॉटेल गुरुमाऊली येथे चार्जिंग पॉईंट आहे. घराकडून निघताना वाहनचालकाने पुरेशी चार्जिंग केलेली नसल्याने अचानक रस्त्यामध्ये इलेक्ट्रिक बाईक बंद झाल्यास करायचे काय? असा प्रश्न वाहनचालकांसमोर ठाकणार आहे. एकतर ज्या ठिकाणी चार्जिंग पॉईंट वा वीज उपलब्ध असलेल्या नजीकचे इथपर्यंत गाडी ढकलत आणावी लागणार आहे; मात्र, ग्रामीण भागातील अनेक आडवळणाच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी घरे नसतात. जर असली तर काहीवेळा कुलूपबंद असतात.

इलेक्ट्रिक बाईकमुळे खर्चात बचत –  एकावेळी चार्ज केलेली गाडी सुमारे १५० किमी धावते. त्यामुळे एका युनिटला सरासरी दहा रुपये खर्च पकडला तरी इलेक्ट्रिक बाईक तीस रुपयांच्या खर्चात १५० किमी धावणार म्हणजेच प्रतिकिमी ५० पैशांपेक्षा कमी प्रवास खर्च होतो. पेट्रोल बाईकच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक बाईकमध्ये पार्ट कमी असल्याने तुलनात्मकदृष्ट्या खर्च कमी येतो.

RELATED ARTICLES

Most Popular