28.7 C
Ratnagiri
Saturday, May 10, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeChiplunचिपळूण बस स्थानकात चार्जिंग केंद्र

चिपळूण बस स्थानकात चार्जिंग केंद्र

प्रवाशांसाठी महामंडळाने इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळाने इंधनाऐवजी इलेक्ट्रिक बसेसचा वापर करण्याचे निश्चित केले असून, त्यानुसार रत्नागिरी विभागात १३३ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. या बस चार्जिंग करण्यासाठी जिह्यात चार ठिकाणी चार्जिंग केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. त्यामध्ये जिह्याच्या मध्यवर्ती असणाऱ्या शहरातील शिवाजीनगर बस स्थानकाचाही समावेश आहे. या बसस्थानकाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, ते काम पूर्ण झाल्यानंतर चार्जिंग केंद्राचे काम तातडीने सुरू केले जाणार आहे. प्रवाशांच्यादृष्टीने मध्यवर्ती बसस्थानकाप्रमाणे शिवाजी नगर बस स्थानकही तितकेच महत्व आहे.

मध्यवर्ती बसस्थानकातून पुढे मुंबई, पुणे, घाटमाथ्यासह खेड तर दसपटीभागाकडे जाणाऱ्या एस.टी.बस फेऱ्या या बसस्थानकातून पुढे रवाना होत असल्याने कायमच शिवाजीनगर बस स्थानकात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. या बस स्थानकाच्या परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने तेथील विद्यार्थ्यासह कामगारवर्गाला या बस स्थानकात प्रवासासाठी सोयीस्कर असल्याने प्रवासादरम्यान त्याची संख्या सर्वाधिक असते. असे असताना हे बसस्थानक विस्ताराने सर्वात मोठे असले, तरी प्रवाशांच्या दृष्टीने सोयीसुविधांच्या बाबतीत कित्येक वर्षापासून दुर्लक्षित आहे.

पाऊसा दरम्यान बस स्थानकात निर्माण होणारे खड्डे, तसेच चिखलाचे साम्रज्य यामुळे हे बसस्थानक कायम प्रवाशांमध्ये चर्चेत आहे. आता या बसस्थानकात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एस.टी. महामंडाने एक पाऊल पुढे टाकले असून प्रवाशांसाठी महामंडळाने इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक बसेससाठी आवश्यक चार्जिंगसाठी जिह्यात चार ठिकाणी केंद्र उभारली जाणार असून त्यामध्ये शहरातील शिवाजी नगर बसस्थानकाचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular