21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriराज्यस्तरीय शर्यतीत चव्हाणांची बैलगाडी प्रथम

राज्यस्तरीय शर्यतीत चव्हाणांची बैलगाडी प्रथम

या स्पर्धेत ७० स्पर्धक सांगली, सातारा, कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यातूनही सहभागी झाले होते.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीकरांनी प्रथमच राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला. शर्यत जिंकण्यासाठी त्या जोड्यांच्या मालकांचा आटापिटा सुरू होता. शौकिनांच्या गर्दीन जोरदार माहोल बनला होता. या वेगाच्या शर्यतीत राजाराम आत्माराम चव्हाण (कडवई, संगमेश्वर) यांच्या बैलजोडीने कमी वेळेत नियोजित अंतर पार करत पहिला क्रमांक पटकावला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रोशन फाळके पुरस्कृत ही बैलगाडा शर्यत पालकमंत्री केसरी स्पर्धा शहराजवळच्या चंपक मैदानावर पार पडली. प्रथमच ही स्पर्धा रत्नागिरीत घेण्यात आली होती.

या स्पर्धेत ७० स्पर्धक सांगली, सातारा, कोल्हापूरसह रत्नागिरी जिल्ह्यातूनही सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी माजी उपनगराध्यक्ष रोशनभाई फाळके, माजी नगरसेवक विकास पाटील, राजन शेट्ये, विजय खेडेकर, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, वसंत पाटील आदी उपस्थित होते. शर्यतीत राजाराम आत्माराम चव्हाण यांची बैलजोडी अव्वल ठरली. त्यांनी ४८ सेकंदात अंतर पार केले.

या बैलगाडीला प्रथम क्रमांक मिळाला असून, १ लाख रुपये रोख आणि मानाची ढाल हिंद केसरी संतोष वेताळ यांच्या हस्ते देण्यात आली. दुसरा क्रमांक नितीन मधुकर देसाई (पाली, रत्नागिरी) यांच्या बैलगाडीला मिळाला. त्यांना पोलिस उपविभागीय अधिकारी विनित चौधरी यांच्या हस्ते ७० हजार रुपये, पारितोषिक व मानाची ढाल प्रदान करण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी सागर अनंत गुरव (आरवली, संगमेश्वर) यांची बैलगाडी ठरली.

RELATED ARTICLES

Most Popular