25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunरासायनिक सांडपाणी नदीत सोडल्याने नागरिकांचा संताप

रासायनिक सांडपाणी नदीत सोडल्याने नागरिकांचा संताप

स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली.

औद्योगिक कंपन्यांचे केमिकलयुक्त सांडपाणी कामथे, कापसाळ येथील नदीत सोडण्याचा प्रकार उघडकीस येताच चिपळूण शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कामथे, कापसाळ येथील ग्रामस्थांनी सोमवारी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक दिली. संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन यावेळी दिले. मात्र कारवाई झाली नाही तर थेट कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.

दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण येथील कामथे गावातील घाटामध्ये औद्योगिक वसाहतमधील कंपनीकडून केमि कल्सयुक्त सांडपाणी नदीमध्ये सोडताना काही टँकर ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. यावेळी टँकर चालक पसार झाले. परंतु पोलिसांनी टँकर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. हे रासायनिक पाणी थेट चिपळूणमधील वाशिष्ठी तसेच शिवनदीत मिसळत असल्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली.

शिवसैनिकांची धडक – शिवसेना पदाधिकारी आणि ग्राम स्थांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे चिपळूण येथील कार्यालयावर धडक देत येथील अधिकारी कुलकर्णी आणि उत्कर्ष शिंगारे यांना धारेवर धरले. ज्या कंपनीने हे केमिकलयुक्त पाणी कामथे येतील नदीमध्ये सोडलेले आहे त्या कंपनीवर कठोर कारवाई करा, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी यावेळी घेतली.

३ दिवसांत कारवाई – अखेर उपस्थित अधिकारी कुलकर्णी यांनी येत्या ३ दिवसांमध्ये सदर कंपनीवर आम्ही कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले. त्याचवेळी आम्हाला तोंडी आश्वासन नको, कृती हवी, लेखी पत्र द्या अशी मागणी लावून धरली. जर पुढील ३ दिवसात कारवाई झाली नाही तर प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयाला टाळं ठोकू असा सज्जड इशारा शिवसैनिकांनी दिला.

टँकरचालकांवरही कारवाई करा – यावेळी शिवसैनिक व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचीदेखील भेट घेतली व संबंधित टैंकर चालक-मालकावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. पोलीस निरीक्षकांनी या संदर्भात तपास सुरू असून संबंधितावर गुन्हे – दाखल करण्यात येतील असे अस्पष्ट आश्वासन दिले.

अनेक शिवसैनिक उपस्थित – यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शिवसेना सचिव संभाजी खेडेकर, शिवसेना विभाग प्रमुख राम डिगे, उपशहर प्रमुख भैय्या कदम, उपतालुकाप्रमुख युवा सेना संजय चांदे, ऋपार्थ जागुष्टे (युवा सेना शहरप्रमुख), युवासेना विभाग प्रमुख राहुल भोसले, शाखाप्रमुख संतोष रहाटे, ‘शाखाप्रमुख सुभाष साळवी, माजी सरपंच शाखाप्रम ख संतोष जावळे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश कांबळे, माजी सरपंच प्रकाश दिघे, शाखाप्रमुख सचिन लटके, पांडुरंग हरेकर, विठ्ठल हरेकर, लक्ष्मण जवरत, प्रवीण खेडेकर, प्रसाद मोरे, शिवसेना तालुका सोशल मीडिया सचिन चोरगे, वाहतूक सेना उपज़िल्हा अध्यक्ष ओंकार पंडित अथर्व चव्हाण, युवासेना आयटीसेल तालुका अधिकारी मंदार निर्मळ कृष्णा माटे, महेश गायकर आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ हजर होते.

RELATED ARTICLES

Most Popular