25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeKhedमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कशेडी बोगद्याची पाहणी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कशेडी बोगद्याची पाहणी…

दुसऱ्या काम सुरू असलेल्या बोगदाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करून उर्वरित दुसऱ्या बोगद्याचे काम कुठपर्यंत आला आहे. त्याची देखील पाहणी केली यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, महाड रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कशेडी बोगद्याच्या ठिकाणी आले यावेळी त्यांनी थांबून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे कशेडी बोगद्याला लागलेल्या गळती बाबत देखील विचारणा केली. यावेळी बोगद्यातील काही ठिकाणी लागलेली गळती थांबवण्यासाठी यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बोगद्यामध्ये एकाच लेनमधून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्यांसाठी वाहतूक सुरू असणार असल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी सूचना केल्या.

तसेच मुदत संपून देखील अजून दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण का नाही झाली याची पाहणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या काम सुरू असलेल्या बोगदाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. काम अंतिम टप्प्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर यादेखील बोगद्याचे उर्वरित काम झाल्यानंतर काही महिन्यातच हा बोगदा देखील वाहतुकीस सुरू होईल असे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular