26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeChiplunमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने प्रवाशांचा खोळंबा, विद्यार्थी व ज्येष्ठांचे हाल

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने प्रवाशांचा खोळंबा, विद्यार्थी व ज्येष्ठांचे हाल

गावात बुधवारी एसटी न आल्याने अनेकांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला.

रत्नागिरीमध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. यासाठी चिपळूण आगारातून ५० बस पाठवण्यात आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. आगारातून सोडण्यात येणाऱ्या १०० नियमित फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या. रत्नागिरी शहरातील चंपक मैदानात मेळाव्याचे आयोजन केले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने यातून शक्तिप्रदर्शनही केले. त्यासाठी विद्यार्थी, वयोवृद्ध, कामगार आणि इतर कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

हा मेळावा आज सकाळी दहा वाजता होणार असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागातूनही बहिणींना कार्यक्रमस्थळी वेळेत आणण्याचे फर्मान सोडण्यात आले होते. यासाठी लांबच्या गावातील महिलांना सकाळी सहा वाजताच प्रवास सुरू करावा संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागात बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना एसटीची वाट पाहावी लागली. ग्रामीण भागातील १०० फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळित झाली. बसस्थानकावर सकाळपासून लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

खासगी प्रवासी वाहतूक जोरात – गावात बुधवारी एसटी न आल्याने अनेकांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला. अनेकांना एसटी येणार नसल्याचे माहितीच नव्हते. त्यामुळे एसटीची वाट पाहिल्यानंतर प्रवाशांना हा पर्याय स्वीकारावा लागला. यात मासिक पास असलेले विद्यार्थी, महिलांना उगाचच जादा तिकिटाचा भूर्दंड भरावा लागला. लांब पल्ल्याच्या प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांची तर खूपच गैरसोय झाली.

RELATED ARTICLES

Most Popular