27.5 C
Ratnagiri
Tuesday, December 3, 2024

एकनाथ शिंदेंनी भाजपची झोप उडविली सरकारला बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव?

मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी...

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत...

‘कोरे’चे विलीनीकरण झाल्यास गुंतवणूक सुलभ – अॅड. विलास पाटणे

कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर रेल्वे मंत्रालयाने...
HomeRatnagiriबालकांच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर - 'यू विन अॅप' विकसित

बालकांच्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर – ‘यू विन अॅप’ विकसित

या मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्टदरम्यान मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये होणार आहे.

जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणाविना वंचित राहू नये, लसीकरणाअभावी बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी आता आरोग्य विभागामाफत यू विन अॅपचा वापर करत बालकांची लसीकरण नोंदणी केली जाणार आहे. या अॅपमुळे बालकांचे लसीकरण सोपे झाले असून, ० ते १८ वयोगटातील मुले तसेच गरोदर, स्तनदा मातांना देण्यात येणाऱ्या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता नवीन अॅपवर नोंद केल्यानंतर बालकाचे लसीकरण होणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्टदरम्यान मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये होणार आहे.

कोरोनामध्ये लसीकरणानंतर नागरिकांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होत होता. त्याच धर्तीवर आता आरोग्य बालकांच्या विविध प्रकारच्या लसीकरणातही लस मिळाल्यानंतरची नोंद मोबाइलवर यू विन पोर्टलद्वारे येईल. लसीकरणाशी संबंधित सर्व तपशिलांची नोंद पोर्टलवर केली जाईल. या पोर्टलद्वारे एका क्लिकवर लसीकरणाशी संबंधित माहिती मिळेल. त्यासाठी जिल्ह्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले. पालकांनी नवीन अॅपवर नोंदणीसाठी मातेचे आधारकार्ड, आधारकार्ड लिंक असलेला मोबाइल नंबर सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याची गरज नाही.

त्या मोबाइलवरील मेसेजद्वारे समजू शकणार आहेत. या यू विन अॅपमध्ये लाभार्थी स्वतः नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहेत. आशा, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, सुमदाय आरोग्य अधिकारी लसीकरणाची लभार्थ्यांच्या पूर्वनोंदणी करू शकणार आहेत तसेच लाभार्थ्यांचे लसीकरण केंद्रावर लसीकरणाच्या दिवशीही नोंदणी करता येणार आहे. शहरातील हद्दीमध्ये अतिजोखमीच्या भागात विविध बालकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. स्थलांतरित बालके याशिवाय रोजगारासाठी शहरी भागात दाखल होणाऱ्या विविध कुटुंबातील मुलांचे लसीकरण वाढल्यास ही टक्केवारी अधिक होऊ शकते.

RELATED ARTICLES

Most Popular