25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriकरबुडे गावातील सरपंचासहित शेकडो ग्रामस्थांनी केला शिवसेनेत प्रवेश

करबुडे गावातील सरपंचासहित शेकडो ग्रामस्थांनी केला शिवसेनेत प्रवेश

गावातील विकासासाठी आम्ही करबुडे येथील ग्रामस्थ पालकमंत्री यांच्यावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे सांगितले.

तालुक्यातील करबुडे गावाच्या ग्रामस्थानी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवत गावातील विकासासाठी करबुडे गावातील सरपंचासहीत ८ सदस्य आणि १० गावकरी मंडळी आणि शेकडो ग्रामस्थांनी पालकमंत्री ना.उदय सामंत आणि रत्नसिंधूचे उपाध्यक्ष किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी गावातील विकासासाठी आम्ही करबुडे येथील ग्रामस्थ पालकमंत्री यांच्यावर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे सांगितले. गावाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी कटीबद्ध असल्याचा शब्द पालकमंत्री यांनी गावाला दिला. करबुडे गावाच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नसून आठ दिवसात १ कोटीच्या कामाची नावे द्या तेही करबुडेसाठी देणार असल्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी जाहीर केले.

यावेळी कार्यक्रमाला उपजिल्हा प्रमुख राजेश मुकदम, तालूका प्रमुख बाबू म्हाप, शंकर सोनवडकर, मिलिंद देसाई, प्रवीण पांचाळ, हरिश्चंद्र बंडबे या पदाधिकारी यांनी येथील लोकांचे पक्ष प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिष्मा गोताड, ग्रामपंचायत सदस्य, अभिषेक धनावडे,वसंत पाचकुडे, दीपिका वेद्रे, शामल खापरे, लक्ष्मण गावडे, समृद्धी साळवी, ममता कळबटे, मंगेश सोनवडकर यांच्या सहीत गावातील गावकर जाणू तांबे, वैभव कलंबटे, नंदकुमार पाचकुडे, सुभाष गोताड, लक्ष्मण गोताड, प्रवीण धनावडे, यशवंत पाष्टे, माजी सरपंच सुनील खापरे, सुभाष गोताड, लक्ष्मण गोताड, विलास वेद्रे, प्रकाश कळबटे, सखाराम ठीक, तानू सोनवडकर, अर्जुन पाचकुडे, जयवंत सोंनवडकर, विजय पाचकुडे, विलास पाचकुडे, भिकाजीं धनावडे, मंगेश धनावडे, किशोर धनावडे, अनंत धनावडे, राजू गोताड, रमेश पाचकूडे, राजू गोताड यांच्या सहीत शेकडो लोकांनी प्रवेश केला.

RELATED ARTICLES

Most Popular