सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पसरत आहेत. वातावरणातील विविध बदलांमुळे अनेक वेळा ऋतू कोणता सुरु आहे याबद्दल सुद्धा संभ्रम निर्माण झाले आहेत. पावसाचा काहीच अंदाज येत नाही. परंतु अशा अवकाळी पडणार्या पावसामुळे बागायतदार मात्र धास्तावले आहेत. उत्तर भारताच्या पर्वतीय राज्यांत थंडीची लाट सुरू आहे. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पर्यटन स्थळांना थंडीच्या गंभीर लाटेचा फटका बसला आहे. येत्या पाच दिवसांपर्यंत थंडीची अशीच गोठवणारी लाट राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानामध्ये मोठी घसरण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा २ ते ३ अंशानी घटत आहे. पुढील काही दिवस राज्यात हीच थंडीची स्थिती कायम राहणार आहे. आज पुण्यामध्ये देखील किमान तापमानात प्रचंड घसरण झाली आहे. दापोलीत सुद्धा पारा १२.७ अंशावर घसरला आहे. सकाळच्या वेळी उजाडलेले सुद्धा कळत नाही. सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. लोक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील तापमानात अति गारठा असाच राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस राज्यात हवामान ठंडा ठंडा कुल कुल राहणार आहे. पण त्यानंतर २१ डिंसेबरपासून राज्यातील किमान तापमानात काही अंश सेल्सिअस वरखाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२२ डिसेंबरला संपूर्ण हिमालय क्षेत्रातील राज्यांत पाऊस मिश्रित बर्फवृष्टीची शक्यता आहे. पर्वतीय पर्यटनस्थळांवर पर्यटकांना या वेळी बर्फवृष्टीत नाताळ साजरा करण्याची संधी मिळू शकणार आहे. लडाख लेहमध्ये १५ अंश, कारगिलमध्ये उणे १२ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे.