20.3 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeSindhudurgचिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांच नाव देण्याची मागणी

चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांच नाव देण्याची मागणी

विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी कोणतेही राजकारण करायचं नाही. उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे महाराष्ट्र सरकारचे MIDC  व पर्यटन विभाग प्रोटोकॉलनुसार ठरवतील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळ उद्घाटन प्रकरणावरून अनेक वादंग सेना भाजपमध्ये सुरु असून, अखेर त्या विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली असून, आज विमानतळाची खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. येत्या ९ ऑक्टोबरच्या होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या रनवेची व इतर सेवा सुविधांची त्यांनी पाहणी केली. राज्य सरकारचा संसदपटू अशी ओळख असलेले बॅरिस्टर नाथ पै यांच नाव चिपी विमानतळाला देण्यात यावे असा विचार आहे आणि तसा प्रस्ताव राज्य सरकारला देखील पाठवण्यात आला आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळावर अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आढावा घेतला, तसेच पाहणी केली आणि चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय हवाईमंत्री जोतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

त्यासोबत विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी कोणतेही राजकारण करायचं नाही. उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे महाराष्ट्र सरकारचे MIDC  व पर्यटन विभाग प्रोटोकॉलनुसार ठरवतील. तसेच जे येतील त्यांचं स्वागतच आहे, असं म्हणत राणेंना कार्यक्रमाला बोलवणार का ! यावर बोलण्याचं जाणूनबुजून त्यांनी टाळलं. सुरेश प्रभू यांनी काल पत्रकारांशी औपचारिक बोलतांना चिपी विमानतळ सुरू होत असल्याचं अद्याप काही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. त्यावर विनायक राऊत यांनी सुरेश प्रभू यांना निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES

Most Popular