28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunगल्ली क्रिकेटमधील भांडण जीवावर बेतले, एकाचा मृत्यू

गल्ली क्रिकेटमधील भांडण जीवावर बेतले, एकाचा मृत्यू

संपूर्ण जगामध्ये क्रिकेट खेळावर जीवापाड प्रेम करणारी अनेक मंडळी मिळतील. सध्या वातावरण सुद्धा चांगले असल्याने आणि मागील २ वर्षापासून सुरु असलेला कोरोनचा प्रभाव कमी झाल्याने, अनेक ठिकाणी गल्ली क्रिकेट खेळले जाते. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा छोट्या छोट्या वाड्यांमध्ये सुद्धा टीम बनवून क्रिकेटचा आनंद घेतला जातो. परंतु, काही वेळेला गेम एवढा गंभीर स्वरूप घेतो याचे उदाहरण कल चिपळूण शहरामध्ये पाहायला मिळाले.

क्रिकेटमध्ये टीममध्ये होणाऱ्या स्पर्धा काहीवेळेला रौद्र रूप घेतात. काही वेळा खेळातील भांडणे, त्याचा सूड घेणे अशे प्रकार घडताना दिसून येतात. चिपळूण शहरात क्रिकेट खेळताना झालेल्या वादात एका मित्राने डोक्यात बॅट घातल्याने गंभीर जखमी झालेल्या लव्हकुमार वर्मा या १७ वर्षाच्या मुलाचा कराड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.

लव्हकुमार वर्मा हा दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्याच्या मित्रांसमवेत सती परिसरातील भाग्योदय नगर येथे मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट खेळतेवेळी त्याचा व त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादाचा राग मनात धरुन त्याच्या दुसर्‍या एका मित्राने त्याच्या हातातील बॅट डोक्यात मारली. पण मारलेला हा फटका इतका जोरदार होता की, यामध्ये लव्हकुमार हा गंभीररित्या जखमी होवून त्याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे त्याला कराड येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता त्वरित दाखल करण्यात आले होते.

रात्री उशिरा येथे त्याचा मृतदेह आणल्यानंतर मोठी गर्दी जमली. चिपळूण पोलिसांकडून मारहाण करणार्‍या मुलाला अटक केली नसल्याने संतप्त झालेल्या त्याच्या आई-वडिलांसह नातेवाईक आणि समाज बांधवांनी लव्हकुमारच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली. चिपळूण पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी भेट देत पालकांची समजूत काढल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular