सध्या हिंवाळ्याचा गारवा जास्तच जाणवू लागल्याने अनेक ठिकाणी चुली आणि शेकोट्या पेटवल्या जातात. सकाळच्या वेळी हवेत जास्तच प्रमाणात जाणवणारा गारठा पळवून लावण्यासाठी शेकोटी पेटवून त्याच्या उबेने शेक घेत दिनक्रम सुरु करतात. महिला वर्ग सुद्धा चुलीवर पाणी तापवणे इत्यादी कामासाठी हे पर्याय वापरले जातात.
चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे एक विवाहिता शेकोटी पेटवून शेक घेत असताना, अंगावरील गाऊनने अचानक पेट घेतल्याने भाजून गंभीर जखमी झाली होती. ही घटना २२ डिसेंबरर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. उज्वला उद्धव देवळेकर वाय ४२, शिरगाव, चिपळूण असे या महिलेचे नाव असून त्या ८० टक्के इतक्या भाजल्या होत्या. त्यांना प्राथमिक उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात मुलीने लगेचच दाखल केले होते.
परंतु, या रुग्णालयामध्ये आवश्यक तेवढ्या सोयी नसल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले. परंतु, ८० टक्के भाजल्याने तिच्यावर सांगली येथे उपचार सुरु असतानाच त्यामध्ये त्यांचे निधन झाले. याबाबतची माहिती सांगली येथील सिव्हील हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. याची नोंद अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अनेकदा अनावधानाने अशा गोष्टी घडत असतात. परंतु काही वेळा अशा घडलेल्या गोष्टी जीवावर बेततात. त्यामुळे आगीच्या बाबतीत खबरदारी घेणे कधीही योग्य. ८० टक्के शरीर भाजल्याने एकतर शरीराला होणार्या वेदना या असह्य होतात. त्यामध्येच त्यांनी त्या वेदना सहन न झाल्याने, उपचारांना साथ देणे बंद केले आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले.