27.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeEntertainmentकोकणच्या सुपुत्राचे दोन मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित

कोकणच्या सुपुत्राचे दोन मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने याचा बॉईज थ्री हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला.

कोकणाला जशी निसर्गाची भरभरून देणगी मिळालेली आहे त्याप्रमाणेच अनेक घटकांमध्ये विशिष्ट कलागुण संपन्न रत्ने देखील कोकणात समाविष्ट आहेत. अनेक जण विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत असून त्यांना मेहनतीचे यश सुद्धा मिळत आहे. अभ्यास, खेळ ते अगदी सिनेजगतात देखील कोकणातील अनेक कलाकार कार्यरत आहेत.

चिपळूणचा सुपुत्र, डीबीजे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी ओंकार भोजने याचे बॉईज थ्री व रूपनगरके चित्ते, असे दोन मराठी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले आहेत. चिपळूणमधील एम. के. थिएटरमध्ये बॉईज थ्री प्रदर्शित झाला; मात्र काही कारणास्तव रूपनगर के चित्ते प्रदर्शित झाला नाही. या पार्श्वभूमीवर नाटक कंपनी चिपळूणच्या सदस्यांनी एम. के. थिएटरचे संचालक संजय शर्मा यांची शनिवारी भेट घेतली. चिपळूणच्या सुपुत्राचा ‘रूपनगर के चित्ते’ हा चित्रपटही प्रदर्शित करावा, अशी विनंती केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत शर्मा यांनी येत्या दोन दिवसा मध्येच हा चित्रपट प्रदर्शित करण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने याचा बॉईज थ्री हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. यामध्ये ओंकारने नरू भोंडवे या खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर रूपनगर के चित्ते या चित्रपटामध्ये एका अवलिया मित्र रशिदाच्या भूमिकेत ओंकार अभिनय करताना दिसून आला आहे.

रूपनगर के चित्ते हा चिपळूणच्या सुपुत्राचा चित्रपट एम. के. थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायलाच हवा, अशी आग्रही मागणी नाटक कंपनी चिपळूणच्या सदस्यांनी केली. या वेळी अभिनेता सचिन कांबळे, योगेश बांडागळे, सावरी शिंदे, मानस संसारे, श्रवण चव्हाण, आदेश कांबळी, प्रद्युम्न देवधर आदी उपस्थित होते. अखेर त्यांच्या आग्रही मागणीला न नाकारता, याला सकारात्मक प्रतिसाद देत रविवार अथवा सोमवारी हा चित्रपट प्रदर्शित करण्याची ग्वाही संचालक शर्मा यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular