चिपळूण बचाव समितीच्यावतीने गेले तेरा दिवस सुरू असलेला नागरिकांचे साखळी उपोषण आता आक्रमक होत असून आता समितीकडून जिल्ह्य बंदची हाक दिली आहे. बुधवार दिनांक डिसेंबर २२ रोजी म्हणजेच अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी चिपळूणकर या माध्यमातून आपला रोष प्रकट करणार आहे.
शासनाने गाळ काढण्याबाबत आखलेल्या निळ्या-लाल पूररेषा रद्द करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यानं चिपळूणकरांमध्ये प्रचंड रोष आणि नाराजी असल्याने रत्नागिरी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दिनांक २२ तारखेला संपूर्ण रत्नागिरी जिल्हा बंद ठेवून चिपळूणकरांच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय व्यापाराने व अनेक नागरिकांनी घेतला आहे.
काल पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे पाठींबा सर्व चिपळूणवासियानी दिला असून, खाजगी वाहतूक, वडाप, चहा टपरी, वाहतूक, रिक्षा अंतर्गत वाहतूक, दुकाने, आस्थापना सर्वच्या सर्व १००% बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे चिपळूणकरांच्या एक दिवशीय बंद १००% यशस्वी झाला आहे.
चिपळूणचे तडफदार आणि कार्यतत्पर आम. शेखर निकम यांनी सुद्धा अधिवेशांच्या पहिल्या दिवशी चिपळूणची जुलै महिन्यात ओढवलेली भीषण परिस्थिती आणि त्यावर आवश्यकच असणाऱ्या उपाययोजना बाबत सविस्तर माहिती दिली. जनतेला नदीतील गाळ काढण्यासाठी इतके दिवस साखळी उपोषण करावे लागत आहे यासारखे दुर्दैव कोणतेच नाही.
जुलै महिन्यात उद्भवलेली महापुराची भीषणता एवढी होती कि, पुन्हा कधीही हि परिस्थिती उद्भवू नये यासाठी चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीचा नियोजनबध्द पध्दतीने तातडीने गाळ काढण्यासंदर्भात आम.शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत चिपळूणच्या जनतेच्या भावना सांगितल्या.
चिपळूण शहराला महापुरापासून वाचवण्यासाठी पूररेषेसंबंधी निर्माण झालेला प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच चिपळूण शहर बचाव समितीच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आम. निकम यांनी वस्तुस्थिती कथन केली.