28.9 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeChiplunडंपरच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

डंपरच्या धडकेत महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू

जिल्ह्यातील अनेक कॉलेज महामार्गालगत असल्याने, अनेक वेळा अपघात घडण्याचे प्रसंग उद्भवतात.

मुंबई महामार्गावरील रस्त्यांची डागडुजी आणि अपघात थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत. महामार्गावरील रस्त्यांची काम आणि त्यासाठी सामानाची वाहतूक करण्यासाठी असणारी वाहने यांच्या बेदरकारपणे वाहने चालवण्यामुळे अनेक अपघात घडून येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना काळामुळे बंद असलेली महाविद्यालये कालपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ पुन्हा सुरु झाली आहे. जिल्ह्यातील अनेक कॉलेज महामार्गालगत असल्याने, अनेक वेळा अपघात घडण्याचे प्रसंग उद्भवतात.

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेले महाविद्यालये पुन्हा सुरु झाल्याने, दोन विद्यार्थिनी मुंबई-गोवा महामार्गावरुन दळवटणे येथे महाविद्यालयातील फी चे पैसे आणण्यासाठी दुचाकीवरुन जाताना मागे बसलेल्या विद्यार्थिनीला डंपरची धडक बसल्याने तरुणीचा जागीच मृत्यू ओढावला.

श्रृती संतोष शिर्के वय १८,  मूळ भोम, सध्या बेंदकरआळी, चिपळूण व जान्हवी एकनाथ जाधव वय १९, दळवटणे या दोघी सकाळी गाडीवरून कॉलेजमध्ये गेल्या होत्या. या दोघीही १३ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहेत. मात्र कॉलेजमध्ये भरण्यासाठी जान्हवी हीची फी राहिल्याने त्या दोघी दळवटणे येथे जात असताना पर्शुरामकडे जाणार्‍या भरधाव वेगाच्या डंपरने त्यांना मागून धडक दिली.

धडक एवढी मोठी होती कि, त्या धक्क्याने या दोघीही रस्त्यावर पडल्या. त्यामध्ये दुचाकीच्या मागे बसलेल्या श्रृतीच्या छातीवरुन डंपरचे चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली. तर जान्हवी ही सुद्धा गाडीवरून पडल्याने जखमी झाली असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकदा महामार्गावरील काम करणाऱ्या कर्मचार्यांना आणि शाळा महाविद्यालयांच्या जवळपास वाहतूक करणाऱ्या वाहनांना सूचना देण्यात आल्या असून सुद्धा अशाप्रकारे अपघात थांबण्याचे नाव च घेत नाही आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular