28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunचिपळूण मतदारसंघाची 'मातोश्री'तील बैठक रद्द

चिपळूण मतदारसंघाची ‘मातोश्री’तील बैठक रद्द

गुहागर मतदारसंघाबाबत मिलिंद नार्वेकर व विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या ‘मातोश्री’वरील बैठकीत चिपळूण मतदारसंघाची बैठक अचानक रद्द करण्यात आली. तश्या साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा कोणताही अजून कायम आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चिपळूण दौऱ्यानंतर चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. रत्नागिरी मतदार संघातील संभाव्य उमेदवाराविषयी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवाराबाबत अजून्ही ‘वेट अॅण्ड वॉच’ आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत “मातोश्री “वर इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र, चिपळूणबाबतची बैठक अचानक रद्द करण्यात आली. राजापूर आणि गुहागर मध्ये विद्यमान आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना काहीही करून रत्नागिरी ची जागा निवडून आणायची आहे, असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर चिपळूणची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

चिपळूण वगळता चारही आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र, राजकीय स्थित्यंतरानंतर चिपळूणचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तर दापोली, रत्नागिरीचे आमदार शिंदेसेनेसोबत गेले आहेत. त्यामुळे सध्या ठाकरेसेनेकडे दोन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचे आघाडीने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचपैकी चिपळूण वगळता चार जागा ठाकरे सेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

गुहागरात कोण चालेल ? – गुहागर मतदारसंघाबाबत मिलिंद नार्वेकर व विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी तुम्हाला कोण उमेदवार चालेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पदाधिकाऱ्यांनी कोणी चालेल असे सांगितले, अशी चचर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागरमधून तगडा उमेदवार दिल्यास ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular