31.4 C
Ratnagiri
Friday, May 16, 2025

वीज समस्येबाबत ठाकरे गट आक्रमक, लांजा महावितरणवर धडक

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरासह तालुक्यातील जनता त्रस्त...

रत्नागिरी बसस्थानकात वृद्ध ठार…

एसटी महामंडळाच्या बसस्थानकाच्या शहरातील लोकार्पणानंतर दुसऱ्याच दिवशी...

मिरकरवाडा जेटीवर शाकारलेल्या नौका हटवा

पावसाळ्यामुळे मासेमारी हंगाम यंदा ३१ मे रोजी...
HomeRatnagiriसमाजसेवा हीच ईश्वरसेवा - अपरांत हॉस्पिटल

समाजसेवा हीच ईश्वरसेवा – अपरांत हॉस्पिटल

रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यात अपरांत हॉस्पिटल आणि चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. चिपळूणमधील अद्यायवत हॉस्पिटल्स मधील एक म्हणून अपरांत हॉस्पिटलची गणना केली जाते. आणि अपरांत हॉस्पिटल रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी महाराष्ट्रात नाही तर देशात नक्कीच आदर्शवत ठरेल, अशी अपेक्षा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन सोहळ्याच्या वेळी केले.

कोविडची पहिली लाट आपण थोपावण्यात यशस्वी झालो आहोत. दुसरी लाट आता संपत आली आहे. आणि तिसरी लाट येऊ नये यासाठी शासन नियोजन करत आहे, परंतु, त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी सांगितले. या डेडिकेटेड कोविड केअर सेंटर मध्ये चांगली रुग्णसेवा दिली जाईल याची मला खात्री आहे. चिपळूण नगरपालिकेने या कोविड सेंटरला ऑक्सीजन प्लांट जोडला असल्याने, अत्यवस्थ रुग्णांना याची मदत होईल. समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, त्यामुळे समाजसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून नगरपालिकेसोबत येथील लोकांना येथेच बर करण्यासाठी आपण हाती घेतलेली ही चळवळ कौतुकास्पद असल्याचे नाम. सामंत म्हणाले. त्याचप्रमाणे चिपळूणमध्ये रुग्णालयाचे बिल भरल्याशिवाय ८-८ तास मृतदेह देत नाहीत, ही चुकीचं आहे, परंतु, या गोष्टीवर सुद्धा आळा बसविण्यात येणे जरुरीचे असून त्याची दखल घेतली गेली आहे.

अपरांत हॉस्पिटल

या डेडिकेटेड कोविड केअर सेंटर लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, कार्यतत्पर आम. शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम माजी आमदार सदानंद चव्हाण, खासदार विनायक राऊत, अपरांत हॉस्पिटल चे संचालक डॉ. रिळकर, डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular