24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriवाचकांचे हक्काचे दालन पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी

वाचकांचे हक्काचे दालन पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य स्थितीमधून सर्वसामान्य नागरिक,पशुधन, मालमत्ता, त्याप्रमाणे पुस्तकांना देखील धोका पोहोचला आहे. चिपळूण मधील लोटिस्मा वाचनालयाला जसा फटका बसला तसाच चिपळुण नगरपालिका पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाचकांचे हक्काचे दालन पुन्हा कार्यान्वित होणे गरजेचे आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय मंदिरासह, चिपळूण नगरपालिका पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध आहे. मात्र, झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयामधील दुर्मिळ आणि मौल्यवान गोष्टींचे जसे नुकसान घडून आले त्याच पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातील अनेक पुस्तके पाण्यामध्ये भिजून, मोठे नुकसान झाले आहे.

या वाचनालयामधील साधारण २१ हजार पुस्तके,२ कॉम्प्यूटर,इर्न्व्हटर आणि सर्व फर्निचर महापुराच्या पाण्याखाली गेल्याने, ती पुन्हा उपयोगात येणे अशक्यप्राय गोष्ट आहे.  एकंदरीत या वाचनालयाचे ७ ते ८ लाख रुपयां दरम्यान नुकसान झाले असून, अनेक दुर्मिळ पुस्तके, पुरातन ग्रंथ, कार्यालयीन नोंदीची माहितीपुस्तिका अशा अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे. पुस्तक वाचनाची आवड सर्वानाच असते असे नाही, परंतु, जे खरे पुस्तकप्रेमी आहेत त्यांचे या पुस्तकांच्या नष्ट होण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वेळीच या चिपळुण नगरपालिका पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची सुद्धा दुरुस्ती करून वाचकांसाठी वाचनालय पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणील स्थानिकांकडून होत आहे. जेणेकरून चिपळूणची वाचन संस्कृतीची परंपरा कायम चालू राहील.

RELATED ARTICLES

Most Popular