26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunचिपळूण पूर नियंत्रणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार

चिपळूण पूर नियंत्रणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार

उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनांमुळे पूरनियंत्रण प्रश्नाला चालना मिळाली आहे.

चिपळूण पूरनियंत्रणाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडे पाठवण्याच्या प्रस्तावाबाबत त्वरित कार्यवाही करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. आमदार शेखर निकम यांनी या प्रश्नाबाबत नुकतेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. त्या वेळी उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या सूचनांमुळे पूरनियंत्रण प्रश्नाला चालना मिळाली आहे. मंत्रालयात झालेल्या चर्चेवेळी चिपळूण महापूर अभ्यासगटाचे सदस्य संजीव अणेराव तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयेंद्र खताते उपस्थित होते.

चिपळूण शहर आणि परिसराला महापुराच्या विळख्यातून कायमस्वरूपी वाचवण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या योजनेमधून निधी मिळावा यासाठी आमदार शेखर निकम यांचा केंद्रीय बंदर, जलवाहतूकमंत्री श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर टूडू यांच्याकडे गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार राज्यशासनाकडून वाशिष्ठी नदीचा सखोल सर्व्हे करून याबाबतचा प्रकल्प अहवाल रितसर प्रस्तावासह केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवावा, असे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आमदार निकम यांना कळवले होते.

त्याला अनुसरून ही भेट होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याशी चर्चा करून प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे मंत्री पाटील यांनी आमदार निकम यांच्याशी सविस्तर चर्चा करून मदत आणि पुनर्वसन खात्याचे प्रधानसचिव यांना केंद्राच्या आवश्यकतेनुसार त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले.

RELATED ARTICLES

Most Popular