चिपळूण कोळकेवाडी धरण परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाकडून दोन ठिकाणी भोंगे वाजवण्यात येणार आहेत. सातारा सिंचन विभाग, रत्नागिरी जलसंपदा विभाग आणि चिपळूणमधील शासकीय कार्यालय यावर्षी प्रथमच समन्वयाने आपत्तीचा सामना करणार आहेत.
गेल्या वर्षी महापूर आल्यानंतर कोळकेवाडी धरणाबाबत अनेक गैरसमज आणि अफवा पसरल्या होत्यात. यंदा तशी स्थिती उद्भवू नये यासाठी रत्नागिरी आणि सातारा पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करणार आहे. कोयना सिंचन मंडळाने कोळकेवाडी धरणासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज केला आहे. संबंधित ग्रामपंचायत आपत्तकालीन परिस्थितीची यांना लेखी तसेच मोबाईल, दूरध्वनीवरून माहिती दिली जाईल. शिरगाव पोलिस ठाणे, तहसीलदार, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधीना देखील तेंव्हाच माहिती पुरवली जाईल.
कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत, मौजे कोळकेवाडी येथे बोलादवाडी नाल्यावर धरण बांधण्यात आले आहे. याची पाणी साठवण क्षमता ०१.२५ टीएमसी एवढी आहे. धरण जलाशयाचा संतुलित जलाशय म्हणून वापर होतो. दररोज सकाळी ८ वाजता कोयना प्रकल्पातून दैनंदिन होणाऱ्या वीज निर्मितीची माहिती रत्नागिरी व चिपळूण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता फोन करून किंवा एसएमएसद्वारे दिली जाईल. त्यामुळे कोळकेवाडी धरणातून चिपळूणच्या दिशेने किती पाणी सोडण्यात आले आहे हे स्पष्ट होईल. पावसाळ्यात प्रकल्पाचे किती टप्पे चालू असतात, त्यातून किती वीजनिर्मिती होते, पाण्याचा किती वापर होतो ही माहिती महानिर्मितीच्या वेबसाईटवर सतत अपडेट होत राहणार आहे.
आपत्कालीन परिस्थिती उध्ध्भावली तर या ठिकाणी भोंगे वाजणार आहेत. कोळकेवाडी धरण माथा, मौजे अलोरे व नागावे गावाचे हद्दीत मंदार कॉलेज जवळ, कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाचा पूरनियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे. धरणातील जलपातळीची प्रत्येक तासाला नोंद घेतली जाणार आहे. दिवसभरातील पर्जन्यमान नोंदी घेतल्या जाणार आहेत.