27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunचिपळूण लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सुविधा उपलब्ध

चिपळूण लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सुविधा उपलब्ध

महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत डायलिसिस उपचार घेता येणार आहेत.

आरोग्य आणि त्याच्या उद्भवणाऱ्या तक्रारी लक्षात घेता योग्य वेळी, योग्य उपचार मिळाले तर रुग्णास नक्कीच फायदेशीर ठरते. सध्या साधारण आजारावरील उपचार देखील इतके महाग झाले आहेत कि, सामान्य नागरिकांना अनेक आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागते. पूर्वी दुर्मिळ असणारे आजार सुद्धा  सध्या अधिक प्रमाणात वाढले आहेत.

चिपळूण व परिसरातील रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता येथील लाईफकेअर हॉस्पिटलने डायलिसिस सुविधा उपलब्ध केली. डायलिसिस मशीनचा आधार घेऊन या प्रक्रियेद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून रक्त शुद्ध केले जाते. शरीरातील टाकाऊ द्रव्ये बाहेर काढली जातात. शरीरातील क्षारांचे व वायूंचे प्रमाण संतुलित ठेवले जाते. शरीरातील टाकाऊ द्रव्ये लघवीवाटे बाहेर पडणे बंद होते. शरीरातील क्षार व वायूंचे प्रमाण अयोग्य होते, अशावेळी ही प्रक्रिया मशिनद्वारे कृत्रिमरित्या करण्याची आवश्यक भासते. ज्याला डायलिसिस असे म्हणतात.

किडनी वाचवण्याच्या सर्व उपचारानंतरही जेव्हा तिचे कार्य थांबते म्हणजेच किडनी निकामी होते; अशावेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य थांबते. अशावेळी संबंधित रुग्णांना डायलिसिस करणे हाच उपचार सुरु करावा लागतो. या रुग्णांसाठी येथील लाईफकेअरच्या वतीने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध केली आहे. रुग्णालयाकडून गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्याकरिता आवश्यक नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी विकारतज्ञ डॉ. विनायक उकीरडे यांचा सल्ला व मार्गदर्शनही उपलब्ध आहे. डायलिसिसकरिता आवश्यक असणाऱ्या ए. व्ही. फिश्चुलाची सर्जरी करण्यासाठी प्लास्टिक सर्जनही रुग्णालयात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहेत. येथे महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत डायलिसिस उपचार घेता येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular