26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeChiplunलंपी आजारामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, वितरण रोडावले

लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसायावर परिणाम, वितरण रोडावले

पाकिटमध्ये आलेले दुध संसर्गजन्य लम्पी आजाराचे लागण झालेल्या गायीचे तर नाही ना अशी भिती व्यक्त करत ग्राहकांनी पाकिटबंद दुधाकडे जणू पाठ फिरवली आहे.

जिल्ह्यात जनावरांमधील लंपी आजाराच्या लक्षणाने दुग्ध व्यवसायावर परिणाम झालेला दिसून येत आहे. चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागातील शेतकरी डेअरीवर आणि घरोघरी जाऊन दुध विकतात. त्यांची संख्या फारशी कमी झालेली नाही. मात्र पाकिटबंद दुधाबाबत लोकांमध्ये अजूनही शंका आहे. चिपळूण तालुक्यात पश्चिम महाराष्ट्रातून पाकिटबंद दुध येतो. हे दुध विक्रेते संघटित नाहीत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून नेमके किती दुध येते याची नेमकी नोंद उपलब्ध नाही. मात्र चिपळूण तालुक्यात सुमारे दिवसा दीड ते दोन लाख लाख लिटर पाकिट बंद दुधाची विक्री होते. शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात दुधाचे वितरण केले जाते.

चिपळूण व खेड तालुक्यात अद्याप लंपी आजार झालेली गुरे आढळलेली नाही. मात्र या दोन तालुक्यात मोकाट गुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याने या गुरांमध्ये लागण झाल्यास झपाट्याने रोग पसरू शकतो. यामुळे मोकाट गुरांवर पशुसंवर्धन विभागाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पाकिटमध्ये आलेले दुध संसर्गजन्य लम्पी आजाराचे लागण झालेल्या गायीचे तर नाही ना अशी भिती व्यक्त करत ग्राहकांनी पाकिटबंद दुधाकडे जणू पाठ फिरवली आहे. शहरी भागामध्ये पाकीटबंद दुध लहान मुलांना पाजले जाते. ते पालकही आता दुध घेणे टाळटाळ करताना दिसत आहेत. लंपीचा फैलाव दुधातून होत नाही याबद्दल पशुसंवर्धन विभागाने जनजागृती करून माहिती दिली आहे. तरीही लोकांमध्ये शंकेची पाल चुकचुकत असून चिंता व भय निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायिकांचे आधीच आर्थिक समीकरण बिघडले होते. त्यामुळे दोन वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर आता कुठे व्यवसाय रूळावर येत असताना, मात्र लंपीमुळे पुन्हा दुग्ध व्यवसायावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. गायी, गुरांमध्ये संसर्गजन्य लंपी आजाराची लागण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा पशुधन विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत, मात्र या आजाराबद्दल नागरिकांमध्ये समज, गैरसमज पसरल्याने अनेकांनी दूध घेणे व पिणे बंद केले आहे. याचा फटका दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular