27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeChiplunलोटिस्मा वाचन मंदिराच्या नवीन सभागृहाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव

लोटिस्मा वाचन मंदिराच्या नवीन सभागृहाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी आपले राष्ट्र इंग्रजांच्या हातामध्ये असताना, दि. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले

चिपळूणमध्ये नुकत्याच ओढवलेल्या महापुरामध्ये वाचनालयाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आणि अश्मयुगकालीन वस्तूंचा संग्रह असलेले लोटीस्मा वस्तुसंग्रहालय पूर्णत: उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर आता संग्रहालय वाचनालयाच्या नव्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर उभारले जाणार असून, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी लागणाऱ्या जागेची आवश्यकता लक्षात घेऊन सध्याचे संग्रहालय असलेल्या तळ मजल्यावरील जागी नव्याने बाळशास्त्री जांभेकर सभागृह  साकारले जाणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आणि कार्यवाह यांनी दिली.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या नव्याने अद्ययावत होणाऱ्या सभागृहाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला असून, बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार, आद्य प्राध्यापक आणि आद्य समाजसुधारक होते. बाळशास्त्रींना भारतातील सर्व प्रथम प्राध्यापक होण्याचा बहुमान १८३४ साली मिळाला होता.

बाळशास्त्री जांभेकर यांचे महान कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी खूप उपयुक्त आणि नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. केवळ प्राध्यापक म्हणून केवळ अध्ययनाचेच कार्य न करता त्यांनी आपल्या दर्पण नियतकालिका मधून सामाजिक सुधारणेसाठी काय गरजेचे आहे, यावर लिहण्यावर त्यांनी भर दिला.  वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी आपले राष्ट्र इंग्रजांच्या हातामध्ये असताना, दि. ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. परंतु, तेंव्हाच सर्व काळ हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली असल्याने, त्या काळामध्ये समाजात राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी विविध प्रकारच्या प्रबोधनाची नितांत गरज होती. आणि त्यासाठी एखादे वृत्तपत्र सुरु करावे,  असे बाळशास्त्रींना वारंवार वाटत असल्याने, त्यांनी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत दर्पण नावाच्या पाक्षिकाची सुरुवात केली होती.

RELATED ARTICLES

Most Popular