26.6 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeChiplunचिपळूणात महावितरणच्या नावे गंडा घालण्याचा प्रकार उघड

चिपळूणात महावितरणच्या नावे गंडा घालण्याचा प्रकार उघड

वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येणार्‍या परंतु महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा व्हॉटसऍप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देवू नये.

ऑनलाईनच्या जमान्यामध्ये फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. आणि अनेक नवनवीन प्रकार समोर येत असल्याने जनता अचंबित होत आहे. चिपळूणमध्ये असा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. पण महावितरणाने वेळीच अलर्ट केल्यामुळे अनेक जण या फसवणुकीपासून वाचले आहेत.

आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने रात्री ९.३० वा. आपला वीजपुरवठा खंडीत करणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट एसएमएस वीज ग्राहकांना पाठवण्यात येत आहेत. चिपळूणमध्ये असे बनावट मेसेज काही नागरिकांना प्राप्त झाले आहेत. अशा प्रकारचे कोणतेही एसएमएस महावितरणकडून पाठवण्यात येत नाहीत. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद अथवा उत्तर देवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

चिपळूण शहरातील लोकांना यापूर्वी ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वेळोवेळी घडले आहेत. त्यात आता महावितरणच्या नावे गंडा घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे. शहरातील अनिल जाधव यांना अशा प्रकारचे एसएमएस आले होते. त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ऑनलाईन गुगल पे द्वारे पैसे भरण्याची मागणी करण्यात आली.

हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी फोन कट केला. त्यानंतर जाधव यांनी महावितरणशी संपर्क साधला. वेगवेगळ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येणार्‍या परंतु महावितरणशी संबंधित एसएमएस किंवा व्हॉटसऍप मेसेज किंवा कॉलला नागरिकांनी प्रतिसाद देवू नये. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आज अनेकांची फसवणूक होण्यापासून वाचली.

RELATED ARTICLES

Most Popular