25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunचिपळूणात अवैध प्लास्टिक व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

चिपळूणात अवैध प्लास्टिक व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या २ दिवसात अनेकांकडून ३ किलो प्लास्टिक जप्त

राज्यात विशेष प्लास्टिक वर बंदी घातलेली असताना देखील अनेक व्यापारी चोरीछुपे प्लास्टिकचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधीपासूनच पालिका अधिकाऱ्यांनी बाजारात कारवाईचे धडक सत्र हाती घेतले आहे. रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्यात हि कारवाई करण्यात येत आहे.

चिपळूण मध्ये देखील प्लास्टिक वापरावर बंदी असतानाही त्याचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी गेल्या २ दिवसात अनेकांकडून ३ किलो प्लास्टिक जप्त करत त्यांच्याकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दिवाळी सणात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल असते. परिणामी गेल्या काही दिवसापासून बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे. अशावेळी प्लास्टिक पिशव्यांचा अधिक वापर होण्याची शक्यता असते. शासनाने प्लास्टिक पिशवीवर बंदी घातली आहे. तरीही बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक आजही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. दिवाळीत अशा प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढू नये यासाठी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानदारांची तपासणी करण्यास सुरवात केली.

आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, दीपक किंजळकर, दीपक जाधव, संकेत मोहिते, रोहन सकपाळ, सागर कदम आदी कर्मचारी बाजारपेठेत फिरून कारवाई करत आहेत. गेल्या २ दिवसांत अनेक व्यापाऱ्यांना दणका देत त्यांच्याकडून ३ किलो प्लास्टिक जप्त करत त्यांना ४ हजारचा दंड आकारला आहे. अनेक वेळा ग्राहकांनी आणलेल्या पिशव्या अधिक सामान खरेदी केल्याने, कमी पडतात आणि मग दुकानदाराकडे पिशवीची मागणी केली जाते. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर सुरू झालेल्या या कारवाईचा प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांनी धसका घेतला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular