22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunचिपळूण खाजगी बेटाच्या मालकाने हरकत घेतल्यानंतर, गाळ काढण्याचे काम थांबले

चिपळूण खाजगी बेटाच्या मालकाने हरकत घेतल्यानंतर, गाळ काढण्याचे काम थांबले

गेल्या काही महिन्यापासून येथील गाळ काढण्यात येत होता. दरम्यान, गुरूवारी संबंधित जागामालकाने आक्षेप घेत काम बंद ठेवण्याची सूचना केली होती.

चिपळूणमध्ये आलेल्या मागील वर्षीच्या जुलै महिन्यातील महापुरामुळे प्रथम प्राधान्य देऊन नद्यांचा गाळ उपसा करणे सुरु आहे. नाम फाउंडेशनच्या सहाय्याने नदी मधील गाळ आणि तयार झालेली बेटे काढण्याचे काम वेगाने सुरु आहे. महापुरामध्ये स्थानिक नागरिकांची अवस्था अतिशय बिकट झाली होती. त्यामुळे अनेक वर्षे नदीचा गाळ उपसा न केल्यानेच अतिवृष्टीच्या पाण्याचा निचरा न झाल्यानेच नद्यांना पूर आला आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

चिपळूण शहरातील गाळ उपासासाठी अनेक अडी अडचणींवर मत करून कामकाज सुरु असताना, बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलाजवळील खाजगी बेटाच्या मालकाने हरकत घेतल्यानंतर येथील गाळ काढण्याचे काम थांबले होते. अखेर शुक्रवारी सकाळी जलसंपदा, यांत्रिकी आणि महसूल अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या बेटाचे सीमांकन करण्यात आले. त्यानंतर गाळ उपशाला सुरूवात झाली. हे बेट एकूण आठ एकराचे असून पाच एकराची खाजगी मालकी आहे. शासनाने पाच एकर बेटाची जागा संपादित करून मोबदला देण्याची मागणी जागामालक अस्लम वांगडे यांनी केली आहे.

वाशिष्ठी नदीतील बहाद्दूरशेखनाका पुलाजवळील बेटात चार पोकलेन, दोन डोझर, १५ टिपरच्या सहाय्याने गाळ उपसा केला जात आहे. बेटाचे क्षेत्र गाळाने भरून विस्तारलेले आहे. गेल्या काही महिन्यापासून येथील गाळ काढण्यात येत होता. दरम्यान, गुरूवारी संबंधित जागामालकाने आक्षेप घेत काम बंद ठेवण्याची सूचना केली होती. परंतु, अखेर कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली असून, पावसाळ्या आधी हे सर्व काम पूर्ण करण्याचे या कर्मचार्यांसमोर एक प्रकारचे आवाहनच आहे. त्यामुळे पुन्हा वेगवान गतीने कामाला सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular