26 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeChiplunतीन महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे, पुन्हा जैसे थे

तीन महिन्यांपूर्वी भरलेले खड्डे, पुन्हा जैसे थे

गणपतीच्या सणानंतर पडलेल्या पावसाने मात्र तीन महिने आधी भरलेले खड्डे उखडले असून संपूर्ण चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील अनेक वर्षापासून कासवापेक्षा देखील अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्याची गती एवढी कमी असल्याने हे काम कधी पूर्ण होईल कि होणारच नाही याबद्दल सांगणे कठीण बनले आहे. वर्षोनुवर्षे धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामाचा वाहनचालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर कळंबस्ते ते कापसाळपर्यंतच्या रस्त्याची एवढी दुर्दश झाली  आहे कि, काही किलोमीटर या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून पावसामुळे सर्व मार्ग चिखलमय झाला आहे.

गणेशोत्सवापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी खड्डे भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केल्याने संबंधित ठेकेदार कंपनीने तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करून खड्डे भरले. सणाच्या दिवसात तितकासा पाऊस पडला नसल्याने हे खड्डे उखडले नाहीत; मात्र धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास चाकरमान्यांसह स्थानिक वाहनचालकांना सहन करावा लागला आहे. गणपतीच्या सणानंतर पडलेल्या पावसाने मात्र तीन महिने आधी भरलेले खड्डे उखडले असून संपूर्ण चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशीच सेम परिस्थिती गुहागर बायपास मार्गाची देखील झाली आहे. पॉवरहाऊस ते मिरजोळीपर्यंत मे महिन्यात भरलेले सर्व खड्डे उखडून आले आहेत. त्यामुळे बायपास मार्गाची चाळण बनल्याने यावरून प्रवास करणे देखील कठीण बनले आहे.

चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात आले होते. परंतू गणेशोत्सवानंतर झालेल्या एकाच पावसामध्ये महामार्गावरील खड्डे अधिकच मोठे झाले आहेत. कळंबस्ते ते कापसाळदरम्यान रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. गुहागर बायपास मार्ग खड्ड्यांमध्ये गेला आहे. चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी येथील खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख मार्गावरून वाहने चालवणे कठीण बनले असल्याने वाहनचालक अधिकारी व ठेकेदारांच्या नावाने हल्लाबोल करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular