27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriकोरोना काळात चिपळूणमध्ये शिक्षक वर्ग मदतीला सरसावला

कोरोना काळात चिपळूणमध्ये शिक्षक वर्ग मदतीला सरसावला

कोरोना काळात ही प्राप्त झालेली मदत नक्कीच अनमोल असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये समाजाच आपण काहीतरी देण लागतो, ही संकल्पना डोक्यात ठेवूनच काही छोट्या मोठ्या स्वरूपातील मदत करायला सर्वच जण पुढे सरसावले आहेत. अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये बर्याच समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. ज्यामध्ये अगदी काही जणांना अन्न पाणी मिळणे सुद्धा कठीण बनले. वैद्यकीय सुविधांचा तुटवडा सुद्धा अधिक प्रमाणात जाणवू लागला आहे. त्यासाठी सुद्धा अनेक संस्था, एनजीओ मोठ्या प्रमाणात सढळ हस्ते मदत करताना दिसतात.

चिपळूण शिक्षक संघाच्या वतीने पुण्यातील विस्टऑन आणि रिअल लाइफ रिअल पिपल या संस्थेकडून प्राप्त झालेले वैद्यकीय सामग्री ज्यामध्ये मास्क, कोविड निर्बंधाची औषधे, थर्मल गन, पीपीई किट्स, ऑक्सीमीटर सनिटायझर इत्यादी साधारण तीन लाखांचे साहित्य तालुक्यातील आरोग्य विभागाला दिले आहे. कोरोना काळात ही प्राप्त झालेली मदत नक्कीच अनमोल असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.

mask

या सर्व साहित्य सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, चिपळूण पंचायत समिती सभापती, प्रांत, तहसिलदार, बीडीओ, जिल्हा सरचिटणीस, संघटनेचे नेते आणि सदस्य मंडळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये श्री. गांधी यांनी सांगितले कि, आमदार निकम हे सर्वच कामामध्ये हिरीरीने सहभाग घेतात, कोणत्याही वेळप्रसंगी मदतीला कायम वेळ काळ न बघता धावून येतात. कोविड काळामध्ये सुद्धा त्यांचे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातून आमच्या संघाने ही मदत केली आहे. त्यामुळे आज त्यांच्याच उपस्थितीमध्ये आम्ही ही सर्व वैद्यकीय सामग्री तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव यांच्याकडे सुपूर्द करत आहोत.

RELATED ARTICLES

Most Popular