26.9 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeChiplunचिपळूणमधील खड्ड्यांचा शिक्षकाने अशा प्रकारे दर्शवला निषेध

चिपळूणमधील खड्ड्यांचा शिक्षकाने अशा प्रकारे दर्शवला निषेध

शिक्षकाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ चक्क रस्त्यावरील खड्ड्यात साबण लावून शर्ट धुतला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे खड्ड्यांनी व्यापला असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. शहर हद्दीमध्ये तर खड्ड्यांचे प्रमाण अधिकच झाले आहे. गुरुवारी रक्षाबंधनसाठी निघालेल्या एका शिक्षकाच्या अंगावर बहाद्दूरशेख नाका येथे चिखल उडाल्याने संतप्त झालेल्या शिक्षकाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ रस्त्यावरील खड्ड्यात साबण लावून शर्ट धुतला.

खड्ड्यावरून सामान्य जनतेलाही प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने एकच संतापाची लाट पसरली आहे. गुरूवारी रक्षाबंधनाच्या सणासाठी सकाळी सती येथील रहिवासी शिक्षक सतीश कदम हे बहादूर शेखनाका येथून मार्कंडीकडे जात होते. या दरम्यान बहादूर शेखनाक्यात खड्ड्यामुळे त्यांच्या अंगावर चिखल उडाला. संतप्त झालेल्या शिक्षकाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ चक्क रस्त्यावरील खड्ड्यात साबण लावून शर्ट धुतला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडियो व्हायरल झाल्याने जोरदार चर्चा सुरू झाली.

पुढे बोलताना ते म्हणाले, महामार्गावरून दररोज ३० किलोमीटर प्रवास करावा लागतो; परंतु खडड्यांमुळे हैराण झालो आहे. त्यातच रक्षाबंधनासाठी जाताना खड्ड्यातील पाणी अंगावर उडाले. त्यामुळे राग अनावर झाला आणि नाइलाजास्तव निषेध व्यक्त करावा लागला. या विषयी आपण रितसर तक्रार दिली आहे. याबाबत माजी ऊर्जामंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचाही फोन आला होता. ते विधान परिषदेत आवाज उठवणार आहेत. आपण शिक्षक असून आम्ही शासनाला कर मोजतो. मग चांगल्या सुविधा का मिळू नयेत.

या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने तालुक्यातील नागरिकांसह लोकप्रतिनिधींची ओरड सुरू आहे. शहरासह वालोपे, कामथे, सावर्डे, असुर्डे,  कापसाळ, खेरशेत आदी ठिकाणी महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. शहरात जून महिन्यात डांबराने खड्डे भरण्यात आले;  मात्र पाऊस आणि रस्त्यावरील वाहतुकीमुळे हे टिकले नाहीत. काही दिवसांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी सावर्डे येथे खड्ड्यात भात लावणीचा प्रयोग करत निषेध नोंदवला होता. आमदार शेखर निकम यांनीही महामार्गाची पाहणी करून तत्काळ पावसाळी डांबराने खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. सावर्डे हद्दीत डांबरीकरणाच्या कामाला ठेकेदार कंपनीने सुरवात केली. जिथे रस्ता जास्त खराब झाला आहे तिथे मोठे पॅचवर्क मारण्यात आले; मात्र पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा डांबरीकरणाचे काम ठप्प झाले.

RELATED ARTICLES

Most Popular