25.1 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunयुनिव्हर्सिटी ऑफ शिकागोकडून चिपळूणमधील प्रणव गोखले संशोधनासाठी आमंत्रित

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोकडून चिपळूणमधील प्रणव गोखले संशोधनासाठी आमंत्रित

भविष्यात उत्क्रांती शास्त्रज्ञ म्हणून भारतातील जैव विविधतेवर काम करण्याचा त्याचा मानस आहे.

चिपळूण शहरातील डीबीजे महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या येथील प्रणव गोखले हा विद्यार्थी जगातील नावाजलेल्या शास्त्रज्ञांसोबत हिमालयातील जंगलात पक्ष्यांवर संशोधन करत आहे. त्याने प्रथम शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात आणि तेथून पुढे डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थानमध्ये एमएस्सीपर्यंतचे शिक्षण घेतले. प्रणव हा मूळचा ताम्हणमळा ता.चिपळूण येथील रहिवासी आहे. भविष्यात उत्क्रांती शास्त्रज्ञ म्हणून भारतातील जैव विविधतेवर काम करण्याचा त्याचा मानस आहे. डेहराडून येथे प्रणवने शिक्षण घेतलेली संस्था ही वन्यजीवांच्या अभ्यासासाठी देशात ही एकमेव शासकीय संस्था आहे.

गेल्या उन्हाळ्यात सुप्रसिद्ध पक्षी शास्त्रज्ञ डॉ. ट्रेवर प्राईस यांच्यासोबत हिमाचल प्रदेशमध्ये तीन महिने संशोधन केल्यानंतर त्याला युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोकडून हवामान बदलामुळे पक्ष्यांवर होत असलेल्या परिणामांच्या संशोधनासाठी बोलावले आहे.

या संशोधनाबद्दल माहिती देताना प्रणव गोखले म्हणाला, ‘हिमालयातील भोजपत्राच्या जंगलात समुद्रसपाटीपासून सुमारे ३ हजार ८०० मीटर उंचीवर ह्युम्स वार्ब्लर हा पक्षी प्रजनन करतो. हा पक्षी याच जंगलात मिळणाऱ्या कीटक खड्ड्यावर अवलंबून आहे. ८ ग्रॅम इतके त्याचे वजन आहे. हा पक्षी थंडी संपल्यावर म्हणजेच हिमालयातील बर्फ वितळल्यावर प्रजनन सुरू करतो. हवामान बदलामुळे हिमालयात बर्फ लवकर वितळतो. परिणामी, हे पक्षी आधीपेक्षा लवकर प्रजनन सुरू करून घरटी बनवतात आणि ती आधीपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या पर्वताच्या भागात बांधतात.

बर्फ लवकर वितळल्यामुळे आवश्यक असलेले कीटक उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे अनेक पक्ष्यांची पिल्लं जगात नाहीत. आणि त्यामुळे घरटी फुकट जातात. आणि जेव्हा कीटक जंगलात उपलब्ध होतात, तेव्हा ते खायला मात्र पक्ष्यांची पिल्लं नसतात. या सगळ्याचा संपूर्ण साखळीवर वाईट परिणाम होतो. कीटक खायला पक्षी नसल्यामुळे भोजपत्र झाडाचे खूप नुकसान होते. त्याची पाने कीटक खूप खातात. परिणामी, त्याचा झाडांच्या जीवनावरसुद्धा परिणाम होतो. वातावरण बदलामुळे प्रजननाच्या वेळेत झालेल्या बदलामुळे संपूर्ण जंगलावर त्याचा परिणाम होत असल्याचे माझ्या संशोधनातून पुढे आले  असल्याचे त्याने सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular