27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeChiplunचिपळूणच्या दाम्पत्याने घरातून मतदान करण्याचा पटकावला पहिला मान

चिपळूणच्या दाम्पत्याने घरातून मतदान करण्याचा पटकावला पहिला मान

८५ वर्षावरील वृद्धांना घरांतून मतदान करण्याची मुभा या धोरणात देण्यात आली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या नवीन धोरणानुसार चिपळूण शहरातील बळवंत सुर्वे व सुमित्रा सुर्वे या दाम्पत्याने घरातून मतदानाचा हक बजावला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुप्तपणे त्यांनी बुधवारी मतदान केले. निवडणूक आयोगाच्या नवीन धोरणाचा लाभ घेणारे चिपळूणमधील हे पहिले मतदार दाम्पत्य ठरले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नवीन धोरण जाहीर केले आहे. ८५ वर्षावरील वृद्धांना घरांतून मतदान करण्याची मुभा या धोरणात देण्यात आली आहे.

त्यासाठी त्या-त्या भागातील निवडणूक अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती कैरून ८५ वर्षावरील वृद्ध मतदारांची यदी तयार करून हे पथक त्या वृद्ध मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहे. या नवीन धोरणाची अंमलबजावणी आता स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. चिपळूण शहरातील बळवंत सुर्वे हे ८५ वर्षावरील वृद्ध पागमळा येथे राहतात. त्यांचे मतदान शहरातील परशुराम नगर येथील डीबीजे कॉलेज बुथवर आहे. या वृद्ध मतदारांची दखल घेत निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी तसेच बीएलओ यांनी बुधवारी त्यांच्या घरी भेट दिली.

यावेळी बळवंत सुर्वे तसेच त्यांच्या पत्नी सौ. सुमित्रा सुर्वे ‘यांनी मतदानाची इच्छा व्यक्त करताच अधिकाऱ्यांनी मतदानाची तयारी केली आणि घरातच गुप्तपणे त्यांना मतदान करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली. सुर्वे दाम्पत्याने देखील अत्यंत आनंदाने आपला मतदानाचा हक्क बजावला. अशाप्रकारे निवडणूक आयोगाच्या नवीन धोरणाचा अवलंब करणारे चिपळूणातील सुर्वे हे पहिले वृद्ध मतदार ठरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या नवीन योजनेनुसार आता वृद्ध मतदारांनी घरातून मतदान केल्याने एक प्रकारे मतदानाला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular