गेले कित्येक वर्षे एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले चिपळूणमधील मातब्बर नेते आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम राजकीय वैर विसरून आता एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर हे दोन नेते एकत्र आले तर चिपळूणमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता असून विरोधकांसमोर एक तगडे आव्हान उभे राहणार आहे. चिपळूणचे राजकारण नेहमीच आम. भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांच्या भोवती फिरत राहिले.
नव्वदच्या दशकापासून या नेत्यामधील राजकीय संघर्षाला सुरुवात झाली. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या मुशीत तयार झालेले आक्रमक नेतृत्व तर रमेश कदम शांत संयमी व मुसद्दी असे काँग्रेसच्या विचारसरणीत निर्माण झालेले नेतृत्व. दोघांची राजकीय सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेतून झाली. विचारसरणीतून संघर्षाला सुरुवात झाली आणि पुढे राडे व हल्ल्यापर्यंत राजकीय स्पर्धा पोहचली.
संघर्ष कमी झाला? – गेले काही वर्षे मात्र या दोघांम धील राजकीय संघर्ष मात्र कमी झाले होते. संघर्षाची भूमिका सोडून दोघांनी देखील एकमेकावर बोलण् किंवा टीका टिप्पणी करणे बंद केले होते. आता मात्र हे दोन्ही नेते जवळ येण्याची शक्यता निर्माण झाली असून तशी चर्चा चिपळूणच्या राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे. सध्या राजकारणात घडत असलेल्या घडाम डी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भाजप, सेना व राष्ट्रवादी या महायुतीचे उभे ठाकलेले आव्हान यामुळे या दोन्ही नेत्यांना एकत्र येणे आता अपरिहार्य बनले आहे.
महाविकास आघाडीमुळे एकत्र – भास्कर जाधव हे विद्यमान आम दार तर आहेतच. पण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते असून जिल्ह्यातील शिवसेनेचे नेतृत्वदेखील त्यांच्याकडे आहे. तर माजी आमदार रमेश कदम् यांच्याकडे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व आहे. त्यामुळे फक्त चिपळूणच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शरद पवार राष्ट्रवादीची जबाबदा आता रमेश कदम यांच्याकडे आली आहे आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी महविकास आघाडीत असल्याने भास्कर जाधव व रमेश कदम यांना एकमेकांजवळ जुळवून घ्यावे लागणार आहे.
तगडे आव्हान – पावसाळ्यानंतर नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुका म हाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशाच होणार आहेत. चिपळूणमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी प्रवेश केला असून त्यांच्याबरोबर काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक देखील आहेत. तर विद्यमान आमदार शेखर निकम आता अजितदादांच्या बरोबर भाजपसोबत आहेत आणि चिपळूणमध्ये भाजपची काही प्रमाणात ताकद आहेच. त्यामुळे स्वराज्य संस्थ निवडणुकीत महाविकास आघाडी समोर एक आहे. तगडे आव्हान उभे राहणार
एकत्र येणार? – महायुतीच्या या आव्हानाला तोडीस तोड प्रतिआव्हान उभे करायचे असेल तर भास्कर जाधव व रमेश कदम यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. हे दोन्ही नेते जर एकत्र आले तर चिपळूणची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून विरोधकासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. सध्या चिपळूणमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चांनुसार हे दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता असून तशा हालचालीदेखील सुरू झाल्या आहेत. आता खरंच सर्व राजकीय वैर विसरून आम. भास्कर जाधव आणि रमेश कदम एकत्र येणार का? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.