28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeKokanख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या जादा गाड्या

ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या जादा गाड्या

कोकण रेल्वे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील विविध मार्गावरून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर जादा गाड्या धावणार आहेत. पुणे ते करमळी, पनवेल ते करमळी आणि एलटीटी ते करमळी या मार्गावर १५ जानेवारीपर्यंत विशेष गाड्या धावणार आहेत. सणाच्या निमित्ताने अनेक जण मित्र मैत्रिणी, कुटुंबासह पर्यटन स्थळी फिरायला बाहेर पडतात. त्यामुळे आधीच त्याचे नियोजन करणे फायद्याचे ठरते. कोकण रेल्वे दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील विविध मार्गावरून जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.

रेल्वे मार्गावर गाडी क्र. ०१४४५ पुणे ते करमाळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून १६ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत दर शुक्रवारी पुणे येथून शुक्रवारी सांयकाळी ५.३० वाजता सुटले. परतीसाठी गाडी क्र. ०१४४६ करमाळी येथून १८ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालवाधीत दर रविवारी सकाळी ९.२० वाजता सुटेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल.

गाडी क्र. ०१४४८ करमाळी ते पनवेल विशेष (साप्ताहिक) गाडी १७ डिसेंबर ते १४ जानेवारीपर्यंत दर शनिवारी करमाळी येथून सकाळी ९.२० वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०१४४७ पनवेल येथून १४ जानेवारी पर्यंत दर शनिवारी रात्री १० वाजता सुटेल. ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल.

विशेष गाडी क्र. ०१४५९ लोकमान्य टिळक (एलटीटी) – करमाळी ही गाडी लोकमान्य टिळक येथून १९ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंत दर सोमवार आणि बुधवारी रात्री ८.४५ वाजता सुटेल.परतीसाठी गाडी क्र. ०१४६० करमाळी येथून २० डिसेंबर ते १२ जानेवारी पर्यंत दर मंगळवार व गुरुवारी रात्री ९.२० वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबा असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular