30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...

फेसबुकवर ओळख झालेल्या महिलेकडून आर्थिक फसवणूक

फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेने शहरातील गोवळकोट...
HomeKhedनिवडणुकीची रणधुमाळी, आता प्रचार वैयक्तिक पातळीवर

निवडणुकीची रणधुमाळी, आता प्रचार वैयक्तिक पातळीवर

सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये तर प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक रंगत आली असून, केवळ दोनच दिवस मतदानासाठी शिल्लक राहिले आहेत. खेड तालुक्यातील अलसुरे, भेळसई, भोस्ते, चिंचवली, घाणेखुंट, कळंबणी बुद्रुक, कोंडिवली, निळीक, संगलट, तिसंगी या दहा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांच्या निवडणूका लागल्या आहेत. यापैकी तिसंगी आणि अलसुरे या दोन ग्रामपंचायती ग्रामस्थांनी बिनविरोध असून, उर्वरित आठ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. या आठ ग्रामपंचायतीच्या काही जागादेखील बिनविरोध झाल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने उमेदवारांनी आता वैयक्तिक प्रचारावर भर दिला आहे. मतदारांची भेट घेऊन सदस्य म्हणून मीच कसा योग्य असणार आहे, मला संधी दिल्यास मी गावाचा विकास कशा पद्धतीने करणार आहे ,हे मतदारांना पटवून देताना उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये तर प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कुणाला किती मत मिळतील याची आकडेमोड सुरू झाली असून शेवटच्या टप्प्यात विरोधकांची मते आपल्याकडे वळवण्याचा जोरदार प्रयत्न देखील सुरू झाला आहे.

ज्या जागांसाठी निवडणूक होत आहे, त्या जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार आता झोकून देऊन प्रचार करताना दिसत आहेत. निवडणूक जरी ग्रामपंचायतीची असली तरी निवडणुकीत हरल्याचा ठपका बसू नये यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. एक-दोन मताने का होईना विजय प्राप्त करायचाच या इर्ष्येने सारे कामाला लागले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर सुरवातीला प्रचार हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून केला जात होता;  मात्र आता शेवटच्या टप्प्यात प्रचाराची पद्धत पूर्णपणे बदली असून आता सुरू असलेला प्रचार वैयक्तिक पातळीवर आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular