गुजरातच्या उद्योगपतींना कोकण किनारपट्टी विकण्याचा कुटील डाव आखण्यात आला आहे. म्हणूनच कोकणातील अनेक गावांत विकासाच्या नावावर सिडको आणून इथल्या सर्वसामान्य जनतेच्या हक्क हिरावण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामध्ये लांजा तालुक्यातील अनेक गावे असून शेकडो हेक्टर जमीन बाधित झाली आहे. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे कधीही होऊ देणार नाही. सिडकोला या कोकणातून हद्दपार करणारच, असा ठाम विश्वास शिवसेना नेते तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी लांजा तालुक्यातील वाडीलिंबू व लांजा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील वाघ्नट व लांजा येथील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्ते यांचा मेळावा रविवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते तथा उमेदवार विनायक राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपनेते तथा आ. राजन साळवी, महिला लोकसभा संपर्क आराडी प्रमुख नेहा माने, महिला जिल्हा संघटिका बेदा फडके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा संघटक दत्ता कदम, विधानसभा संपर्क प्रमुख अॅड. चंद्रप्रकाश नकाशे, ओ. बी.सी. सेल जिल्हा अध्यक्ष पांडुरंग उपळकर, लांजा तालुका संपर्क प्रमुख जगदीश जुलूम, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड, तालुका प्रमुख संदीप दळवी, उपतालुक प्रमुख सुरेश करबळे, उद्योजक अनिल पत्याणे, प्रसाद माने युवासेना तालुका अधिकारी, दीपाली साळवी तालुका युवतीधिकारी तसेच विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामपंचायत, बुथप्रमुख, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख मुंबई व ग्रामीण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, प्रभू रामचंद्रांच्या नावावर ज्यांनी धंदा मांडला, पैसे कमविले अशा नालायक लोकांना दारात सुद्धा उभे करू नका या देशातील प्रत्येक नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतली असून या देशाला उद्योगपतींच्या तावडीतून सोडविण्यासाठी मशाल या चिन्हावर शिक्का मारून शिवसेनेच्या माध्यमातून झालेली विकास कामे कार्यकर्त्यांनी घराघरात पोहचविण्याचे आवाहन विनायक राऊत यांनी केले. यावेळी गवाणे, वाकेड जिल्हा परिषद गट तसेच लांजा शहरातील शिवसेनेचे शेकडो प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. राजन साळवी व नेहा माने यांनी देखील सर्व कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.