29.8 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriनदीकाठच्या नागरिकांना पुराचा वाढता धोका

नदीकाठच्या नागरिकांना पुराचा वाढता धोका

१ लाख २४ हजार १५० लोकांना पुराचा धोका जाणवू शकतो.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तालुका व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. नैसर्गिक आपत्ती व पूरस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २०६ नदीकाठच्या गावांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असून १ लाख २४ हजार १५० लोकांना पुराचा धोका जाणवू शकतो. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून कोकणात वेळेत आगमन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याला अनुसरून साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार केला आहे. अतिवृष्टीच्या भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरेशा औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थिती उद्भवणाऱ्या गावांमध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या साथी पसरण्याची शक्यता असते. तसेच पाण्याचे स्त्रोत दूषित होण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ आदी आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ होऊन हिवताप, डेंगी, चिकुनगुन्या आदी आजार वाढण्याची शक्यता असते.

त्याअनुषंगाने सज्जता राखली जात आहे. नैसर्गिक आपत्ती व पूरस्थिती नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार बाधित होणाऱ्या गावांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. संबंधित गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे, धामणसे, कोतवडे, निवेंडी, भगवतीनगर, चाफे, जांभरुण, आगरनरळ, सोमेश्वर, कशेळी, निवळी, ओरी, चिंद्रवली, पोमेंडी खुर्द, चांदेराई, मावळंगे, कुरतडे, पावस, वेतोशी, टेंभ्ये, खारगाव, चरवेली, वेळवंड, पानवल, कापडगाव, वेल्ये, बोंडये, तरवळ, तोणदे, करबुडे, पोमेंडी बुद्रुक, शिवार आंबेरे, राई, वरके, कळझोंडी, गावडेआंबेरे, नाखरे, कोळंबे, टिके, हरचेरी या गावांचा यादीत समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular