24.6 C
Ratnagiri
Tuesday, February 4, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriबंद परशुराम घाटामुळे अनेक अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

बंद परशुराम घाटामुळे अनेक अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा

परशुराम घाट बंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

कोकणात दोन दिवसापासून, मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आधीच वाहनांचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद केल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने नऊ जुलैपर्यंत परशुराम घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना मोठा वळसा घालून जावं लागत आहे. यामुळे हायवेवर देखील अवजड वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहे. हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस मार्गे सुरू असून परशुराम घाट बंद असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.

चिपळूण उपविभागीय अधिकाऱ्यांकडुन बुधवारी काढण्यात आलेल्या आदेशात अवजड वाहनांनी या मार्गावरून प्रवास करू नये असं स्पष्ट करण्यात आलं नसलं तरी पर्यायी असलेल्या चिरणी आंबडस मार्गे केवळ हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे. पर्यायी मार्ग हा अवजड वाहनांसाठी काही तीव्र असलेल्या उतारामुळे फारसा योग्य नाही. त्यामुळे अवजड वाहने या मार्गे न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अवजड वाहनांच्या कित्येक किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. यामुळे चिरणी मार्गे अवजड वाहनांची वाहतूक होणार नसल्याने या मालवाहू वाहने कंटेनर यांच्या कित्येक किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत तर एसटी व खाजगी बसेसलाही या पर्यायी मार्गावरून प्रवेश नाही. त्यामुळे मुंबईहुन चिपळूण तसेच दापोली खेड, मंडणगडवरून चिपळूण, रत्नागिरीकडे जाणाऱ्या एसटी बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular