24.7 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriबेकायदेशीर मच्छिमारी न थांबविल्यास मत्स्य खात्याला टाळे ठोकण्याचा इशारा

बेकायदेशीर मच्छिमारी न थांबविल्यास मत्स्य खात्याला टाळे ठोकण्याचा इशारा

कर्ला, राजीवडा, मिरकरवाडा, जयगड मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी सुरू आहे.'

सागरी जलदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात एलईडीच्या साहाय्याने बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. या मासेमारीला ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांना नोकरीवरून काढून टाका, अशी आक्रमक मागणी करत पारंपारिक मच्छिमारांनी बेकायदेशीर मच्छिमारीविरोधात एल्गार पुकारला. बेकायदेशीर मासेमारी न थांबल्यास आम्ही संबंधित खात्याच्या कार्यालायाला टाळे ठोकू, असा इशारा दिला आहे. मत्स्य खात्याला पारंपारिक मच्छीमारांच्या १० वावामध्ये मासेमारी करणाऱ्या नौका ड्रोन कॅमेऱ्यामध्ये येतात. मग ५ वावात एलईडी मासेम ारी करणाऱ्या नौका का दिसत नाहीत ? यावर कारवाई झाली नाही तर आता आमचाही संयम ढळेल. मग एकदा आम्ही कायदा हातात घेतला तर कार्यालयालादेखील टाळे ठोकू, असा सज्जड दम शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे अध्यक्ष रणजित उर्फ छोट्या भाटकर यांनी सहायक मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना भरला.

कार्यालयावर धडक – राज्याच्या जलधी क्षेत्रात म्हणजेच १२.५ नॉटीकल मैलच्या आतील समुद्रात ही मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमारांना मासळी मि ळेनाशी झाली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत धोक्याचा इशारा असल्याने पारंपरिक मच्छीमार नौका बंदरातच होत्या. या सर्व घडामोडींमुळे पारंपरिक मच्छीमार अडचणीत आला आहे. त्यात एलईडी मासेमारी आणि बेकायदेशीर मासेमारी (मिनी पर्ससिननेट मासेमारी) मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तरी नौकांवर कारवाई केली जात नाही, त्याच्या निषेधार्थ बुधवारी शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे एक शिष्टमंडळ सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडकले.

नोकरीवरून काढून टाका – रत्नागिरीतील कर्ला, राजीवडा, मिरकरवाडा, जयगड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी सुरू आहे.’ या ठिकाणी मत्स्य विभागाचे सागरी सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहेत, परंतु ते सुरक्षेचे काम करताना दिसत नाहीत, असा आरोप पारंपारिक मच्छिमारांनी उघडपणे केला आहे. जे कारवाई करत नाहीत त्यांना नोकरीवरून काढून टाका, अशी मागणीदेखील या मच्छिमारांनी केली. १० वावापर्यंत आम्ही मासेमारी करताना ड्रोन कॅमेऱ्यामध्ये आमच्या नौका दिसतात. मग ५ वावामध्ये बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या नौका का दिसत नाहीत? आम्हांला जे दिसते ते मत्स्य विभागाला का दिसत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. आता आमचा संयम ढळत चालला आहे. आम्हाला व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. आम्ही कायदा हातात घेतला तर कुचकामी ठरलेल्या मत्स्य विभागालादेखील टाळे ठोकू, असा इशारा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मत्स्य विभागाला देत मागण्यांचे निवेदन सादर केले.

कारवाई करणार – दरम्यान शाश्वत मच्छीमार हक्क संघाचे शिष्टमंडळ आम्हाला भेटले. बेकायदेशीर एलईडी, पर्ससिननेट आणि मिनी पर्ससिनेट मासेमारीबाबत त्यांचा आक्षेप आहे. अशा बेकायदेशीर मासेमारीवर कडक कारवाई केली जाईल, असे यानंतर प्रभारी सहाय्यक मत्स्य अधिकारी स.वी. कासेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular